येळवडे : सुरक्षारक्षकाच्या मुलीची आत्या बनून नामकरण करताना चित्राताई वाघ. sakal
महाराष्ट्र बातम्या

चित्रा वाघ यांनी राधानगरीत सुरक्षा रक्षकाच्या मुलीचं केलं बारसं

राजू पाटील : सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : येळवडे (Yelevade, Radhanagri) (ता. राधानगरी ) येथील जुन्या धाटणीचे माडीचे ते घर आज सजले होते. दारात रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या होत्या. घरातल्या चिमुकल्या मुलीचे बारसे होते आणि घराला प्रतीक्षा होती आत्या येण्याची. दुपारी 'त्या' आल्या; चिमुकलीला कवेत घेतलं, कौतुक केलं आणि पाळण्यात ठेवून कौतुकाने नामकरणही केले. या मुलीच्या आत्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या (Chitra Wagh) चित्राताई वाघ.

येळवडे : सुरक्षारक्षकाच्या मुलीचे कोड कौतुक करताना चित्राताई वाघ.

येळवडे येथील अंजली शेळके यांच्या नातीचे आज बारसे. पती साथ सोडून गेल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून त्या आपल्या तीन मुली आणि मुलासह संसार सांभाळत आहेत. हातात खोरे- कुदळ घेवून शेती सांभाळणाऱ्या या महिलेच्या पहिल्या मुलीचे प्रज्ञाचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले. ठिकपुर्ली येथील पोलीस दीपक पाटील हे त्यांचे जावई. ते सध्या चित्राताईंचे सुरक्षा रक्षक आहेत. दीपक यांना मुलगी झाल्याचे कळताच तिच्या बारशाला येण्याचे सौ. वाघ यांनी निश्चित केले आणि तो दिवस आज उजाडला.

श्रीमती शेळके यांच्या जुन्या दगडी बांधकामाच्या माडीच्या घराला आज फुलांचे तोरण लागले होते. नेहमी पेक्षा आज बारशाचा डामडौल जरा वेगळा होता. मोजकेच पाहुणे असले तरी मराठमोळ्या धाटनीत स्वागत' फुलांच्या रांगोळ्यांनी झाले. सौ. वाघ या दुपारी येताच त्यांचे औक्षण करून स्वागत झाले. घरात येऊन 'आत्या' चित्राताई यांनी चिमुकलीला मांडीवर घेतले. ' बेटी म्हणजे धनाची पेटी... ज्या घरात मुली जन्माला येतात त्या घरात लक्ष्मी वास करते' असे सांगून तीचे ' श्रीजा' असे नामकरण केले, पाळणाही म्हंटला. या घरगुती कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद ही त्यांनी व्यक्त केला. सबंध कुटुंबात एकरूप झाल्या. या कार्यक्रमात पाटील आणि शेळके कुटुंबीय मोजकेच पाहुणे सहभागी झाले होते. सामान्य कुटुंबाच्या या छोटेखानी कार्यक्रमाची सौ. वाघ यांच्या सहभागाने उंची मात्र वाढली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT