ahmadnagar political News 
महाराष्ट्र बातम्या

'अहिल्यादेवींना फक्त लोकमाता किंवा पुण्यश्लोक म्हणा'

'राजामाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत आणि महाराणी फुटाफुटावर आहेत'

सकाळ डिजिटल टीम

'राजामाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत आणि महाराणी फुटाफुटावर आहेत'

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी येथे एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते. या आयोजित कार्यक्रमासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी रोखलं होतं. आम्हाला रोखण्याचं षडयंत्र शरद पवारांचे असल्याचा आरोप पडळकरांनी केला होता. दरम्यान, पवारांनी जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून आमदार पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ahmadnagar political News)

आता आणखी एक बातमी समोर येत आहे. ३१ मे रोजी चौंडीतील कार्यक्रमातील माजी आमदार अनिल गोंटे (Anil Gote) यांच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला आहे. गोंटे यांनी भाषणात राजमाता आणि महाराणींचा अवमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज दुपारी जामखेड येथील खर्डा चौकात अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमींच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.

या घटनेमुळे राजकारण आणखी गरम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपा तर्फे गोंटे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. ‘राजमाता हे विशेषण महाराष्ट्रातील ठराविकच महान स्त्रियांना लावले जाते. गोंटे यांच्या या वक्तव्याने त्यांचा अवमान होत आहे, असं भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी म्हणाले आहेत. भाजपच्या वतीने गोटे व कार्यक्रम संयोजकांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.

कार्यक्रदरम्यान, भाषण करत असताना सुरुवातीलाच अहिल्यादेवींचा उल्लेख राजमाता किंवा महाराणी असा न करता पुण्यश्लोक असा करावा, अशी सूचना मांडली. मात्र, ही सूचना करताना त्यांची जीभ घसरली. अहिल्यादेवींना फक्त लोकमाता किंवा पुण्यश्लोक म्हणा. त्यांना राजमाता किंवा महाराणी म्हणू नका, असं बोलून तुम्ही त्यांचा अपमान करताय. राजामाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत आणि महाराणी फुटाफुटावर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले.

दरम्यान, आता गोंटे यांच्या भाषणातील हा मुद्दा आता गाजू लागला आहे. माजी आमदार गोंटे यांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आद दुपारी ३ वाजता जामखेडमधील खर्डा चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. यासाठी अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तेथून जामखेड तहसिलदार कार्यालयात जाऊन गोंटे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT