civil hospital

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सिव्हिल हॉस्पिटलमधील नोंदी! पतीच्या जेवणात पत्नी, सासू, मेव्हणीने घातली दारु सोडायची गोळी, पती दवाखान्यात; दारुच्या नशेत मुलाची आईला मारहाण, शेतीच्या बांधावरुन मारहाण, सर्पदंश, वाचा...

सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक गावांमधील रुग्ण उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. मंगळवारी कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील एका विवाहितेने पतीचे दारुचे व्यसन सुटावे म्हणून आई व बहिणीच्या मदतीने पतीच्या जेवणात दारु सोडायची गोळी टाकली. त्यानंतर पतीला त्रास होऊ लागला आणि तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक गावांमधील रुग्ण उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. मंगळवारी कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील एका विवाहितेने पतीचे दारुचे व्यसन सुटावे म्हणून आई व बहिणीच्या मदतीने पतीच्या जेवणात दारु सोडायची गोळी टाकली. त्यानंतर पतीला त्रास होऊ लागला आणि तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. याशिवाय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हाणामारी, सर्पदंश, औषध प्राशन अशा अनेक नोंदी झाल्या.

‘सिव्हिल’मधील नोंदी अशा....

पत्नीने जेवणात घातली दारू सोडायची गोळी

सोलापूर : पत्नी, सासू व मेव्हणी यांनी प्रविणकुमार गोरखनाथ गायकवाड (वय ४५, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) यांच्या जेवणात दारू सोडायची गोळी घातली होती. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास जेवणानंतर प्रविणकुमार यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर प्रविणकुमार स्वतः सायंकाळी पाचच्या सुमारास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

-----------------------------------------------------------------------------------------------

शेतीच्या बांधावरून महिलेस मारहाण

सोलापूर : शेतीच्या बांधावरून उचेठाण (ता. मंगळवेढा) येथे रोहिणी दत्ता साखरे व अन्य नऊ जणांनी मिळून गंगाबाई युवराज साखरे (वय ३८) या महिलेस मारहाण केली. १५ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही मारहाण झाली होती. लाकडाने व लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत गंगाबाई यांच्या सर्वांगास मार लागला होता. मंगळवेढ्यातील सरकारी रुग्णालयातून त्या स्वतः मंगळवारी पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------

जागेच्या कारणातून आहेरवाडीत मारहाण

सोलापूर : जागेच्या वादातून मल्लव्वा गंगाधर कोणदे, भैरव्वा कोणदे व अन्य तिघांनी मिळून शाहीन सैपन शेख (वय ४०, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांना मारहाण केली. आहेरवाडीच्या शिवारातील शेतात ही मारहाण झाली. दगडाने व लाकडाने केलेल्या मारहाणीत शाहीन शेख यांच्या डोक्याला मार लागला असून सर्वांगास मुकामार लागला आहे. मुलगा वाहिद याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तर सैपन शेख, दौला नदाफ व अन्य तिघांनी जागेच्या कारणातून मारहाण केल्याने जखमी झालेल्या मल्लव्वा कोणदे या देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

-------------------------------------------------------------------------------------------

बोरोटी येथील चिमुकल्यास सर्पदंश

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी स्टेशन येथील राज नागेश कोळी (वय १०) याला मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास साप चावला. राज हा घराजवळ असताना त्याच्या डाव्या पायाला साप चावला. त्याचे काका सुधीर कोळी यांनी राजला उपचारासाठी अक्कलकोटच्या सरकारी दवाखान्यातून सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

--------------------------------------------------------------------------------------------

अंत्रोळीत तरुणाने प्राशन केले औषध

सोलापूर : घरगुती वादातून पिंटू बाबुराव करपे (वय २९, रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर) या तरुणाने पिकांवर फवारणीचे औषध प्राशन केले. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. नातेवाईकांनी त्यास मंद्रूपच्या सरकारी रुग्णालयातून सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

----------------------------------------------------------------------------------------------

घरगुती जागेवरून दोघांकडून तरुणास मारहाण

सोलापूर : जागेच्या वादातून रंजित राजाराम रजपूत व रणवीर रजपूत या दोघांनी गोविंदसिंग सरदारसिंग रजपूत (वय ३८, रा. माळी गल्ली, मंद्रूप) यास मारहाण केली. विटाने व लाकडी बांबूने मारहाण केल्याने गोविंदसिंग यांच्या उजव्या हाताला मार लागला आहे. तसेच सर्वांगास मुकामार लागल्याने ते स्वतः उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------

खेळताना पडल्याने दोन चिमुकले जखमी

सोलापूर : घराजवळ खेळत असताना अचानक तोल गेल्याने रुद्र अजय बाडीवाले (वय ८, रा. कुमठा, म्हेत्रे वस्ती) हा पडला. यात त्याच्या डोक्याला मार लागला असून त्याला वडिलांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दुसरीकडे बापूजी नगरातील सोनी भिमप्पा भंडारे (वय ११) ही घरातील गच्चीवर खेळत होती. अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिच्या डोक्याला व हाताला मार लागला असून तिला चुलत्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------

पैशावरून वाद झाल्याने महिलेने प्राशन केले औषध

सोलापूर : घरी असताना पैशाच्या कारणातून वाद झाला. या रागातून प्रिती राहुल बुऱ्हाणपुरे (वय २५, रा. महाराणा प्रताप झोपडपट्टी, कुमठा नाका) या महिलेने औषध प्राशन केले. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना त्रास होऊ लागल्याने काका दत्तात्रय बाडीवाले यांनी प्रिती यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------

नशेत मुलाची आईला मारहाण

सोलापूर : घरी असताना दारूच्या नशेत मुलाने आईचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात कमला रमेश अंबेवाले (वय ४४, रा. सदर बझार, सोलापूर) या महिला जखमी झाल्या आहेत. सर्वांगास मुकामार लागल्याने त्यांना मुलगी चंदा यांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

बाळेतील संतोष नगरात विवाहितेला मारहाण
सोलापूर : बाळे येथील संतोष नगरात मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शीतल महेश कोरे (वय २७) असे मारहाणीत जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी शीतल या घराजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी अथर्व दिवेकर, पप्पू राऊत व इतर चौघांनी पूर्ववैमनस्यातून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी गेटला त्यांचे डोके आदळले. यात त्यांच्या डोक्याला जखम झाली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने सर्वांगास मुकामार लागला. जखमी अवस्थेत शीतल यांना पती महेश याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
----------------------------------------------------------------------------------------------
वादातून महिलेने खाल्ले मुंग्या मारण्याचे औषध
सोलापूर : घरगुती कारणातून झालेल्या वादानंतर त्रासलेल्या महिलेने मुंग्या मारण्याचे औषध खाल्ले. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. मंजुळा अंबादास वाघमारे (वय ५०, रा. शेळगी) असे त्या महिलेचे नाव आहे. घरगुती वादानंतर मंजुळा संतापल्या होत्या, त्यातूनच त्यांनी मुंग्या मारण्याचा खडू खाल्ला. काही वेळाने त्यांना त्रास होऊ लागला. मंगळवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास मुलगा विनायक याने आईला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
-------------------------------------------------------------------------------------------------
फिनेल पिऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर : भवानी पेठ परिसरातील राजीव गांधी नगर येथील राज हणमंत जाधव (वय २६) याने मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घराबाहेर फिनेल प्राशन केले. त्याने औषध प्राशन केल्याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. औषध प्राशन केल्यावर त्याला त्रास होऊ लागल्याने वडिलांनी त्यास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
-----------------------------------------------------------------------------------------
जेवणावरून भाच्याची मामाला मारहाण
सोलापूर : जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादानंतर भाच्याने मामाला विटाने मारहाण केली. मोदी परिसरात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही मारहाण झाली. गोपाळ पांडुरंग म्हेत्रे (वय १८, रा. मोदी, सोलापूर) असे मारहाण झालेल्या मामाचे नाव आहे. सोमवारी रात्री गोपाळ यास भाचा विनायक बेरुनगी याने जेवण मागितले. त्यावर मामा गोपाळने जेवण द्यायला नकार दिला. त्यावेळी चिडलेल्या विनायकने जवळच्या विटाने मामाला मारहाण केली. यात गोपाळच्या डोक्याला जखम झाली असून, त्याला वडील पांडुरंग यांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
------------------------------------------------------------------------------------------
चेस्टामस्करीत एकास दगडाने मारहाण
सोलापूर : चेस्टामस्करीतून झालेल्या वादानंतर शांती चौकातील हिंदू स्मशानभूमीजवळ माऊली डांगे याने आनंद सोपान पवार (वय ४६, रा. बाळीवेस) यास दगडाने मारहाण केली. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंदू स्माशनभूमीजवळ माऊली डांगे व आनंद पवार या दोघांमध्ये चेस्टामस्करी सुरू होती. यावेळी चिडलेल्या माऊलीने आनंदला दगडाने मारहाण केली. मारहाणीत आनंदच्या डाव्या पायाला जखम झाली असून, त्यांना भाच्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
पाणी समजून फिनेल पिले; वृद्धा रुग्णालयात
सोलापूर : एमआयडीसी परिसरातील नीलमनगर येथील ७५ वर्षीय वृद्ध महिलेने सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पाणी समजून फिनेल प्राशन केले. अंबूबाई सत्यनारायण ताटीपामूल असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. अंबूबाई या सोमवारी रात्री त्यांच्या घरात होत्या. तहान लागल्याने त्यांनी चुकून पाणी समजून फिनेल प्राशन केले. काही वेळाने त्यांना त्रास होऊ लागल्याने सून अनुराधा ताटीपामूल यांनी अंबूबाई यांना दुपारी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
-----------------------------------------------------------------------------------------------
तडवळे येथे एकाला मारहाण
सोलापूर : माढा तालुक्यातील तडवळे येथे विनाकारण एका ५४ वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास विलास हरीबा कन्हेरे (रा. तडवळे (अ), ता. माढा) यांना किसन राजेंद्र पाखरे व शिवाजी पाखरे यांनी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात सर्वांगास मार लागल्याने विलास कन्हेरे यांना माढ्यातील सरकारी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
बैलाने मारल्याने वृद्ध जखमी
सोलापूर : शेतात बैल बांधत असताना बैलाने मारल्याने ७१ वर्षीय वृद्ध जखमी झाला. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. अकबर इब्राहिम जमादार असे त्यांचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी ते शेतात बैल बांधत होते, त्यावेळी अचानक बैलाने छातीत धडकी दिली. त्यात त्यांना मुकामार लागला. खासगी रुग्णालयातून त्यांना मुलाने पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महत्त्वाची बातमी! मोदी सरकार LIC मधील भागीदारी विकण्याच्या तयारीत; तुमच्या शेअर्स अन् पॉलिसीचं काय होणार?

राज्यात आणखी पाच न्यायालयात स्थापन होणार, शेतकऱ्यांशी संबंधित योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

Jalna Village Road: कुंभार पिंपळगाव-जालना परिसरात शाळेकडे चिखलातून विद्यार्थ्यांची धावपळ; गणवेश, बूट चिखलमय, पालक-ग्रामस्थ संतप्त

Best Investment: SIP, FD की RD? दरमहा 5 हजार रुपये गुंतवल्यास 10 वर्षांत कुठे मिळेल सर्वाधिक पैसा?

Robbery News : लोणीमध्ये दोन वेगवेगळ्या घरफोड्या; वृद्ध महिलेचा धमकावून सोन्याचे दागिने व बंद घरातून पेटी-सुटकेस लांबवून अडीच लाखांचा ऐवज गायब

SCROLL FOR NEXT