Students esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन्‌ क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात पार पडली. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलन देखील झाले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात पार पडली. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलन देखील झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता ५ मेपर्यंत बारावीचा आणि १५ मेपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण न झालेले अनेकजण बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र तयार करतात. पण, आता असे गैरप्रकार कायमचे बंद होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे एकाच पानावर मिळणार आहे. त्यावर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो असणार आहे.

याशिवाय त्यावर क्युआर कोड देखील असणार आहे. तो क्युआर कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती समजणार आहे. पहिल्यांदाच बोर्डाने हा बदल केला असून त्यातून बनावटगिरीला कायमचा चाप बसणार आहे. दरम्यान, आता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्रिकांची छपाई सुरु असल्याचेही बोर्डातील सूत्रांनी सांगितले. निकालानंतर साधारणत: एक महिन्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे.

१७ मेपासून अकरावी प्रवेशाला सुरवात

गतवर्षीपासून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवली जात आहे. सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन अनेक विद्यार्थी कॉलेजला केवळ परीक्षेला जातात आणि वर्षभर कोचिंग क्लासला हजेरी लावतात. असे गैरप्रकार बंद व्हावेत, कागदावरील आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी यात तफावत राहू नये हा त्यामागील हेतू आहे. यंदा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १७ मेपासून अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरु होणार आहे. ऑनलाइन गुणपत्रिकेवरून विद्यार्थ्यांना सुरवातीला महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. त्यादृष्टीने माध्यमिक शिक्षण विभाग नियोजन करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Hidkal Reservoir Fort : 50 वर्षांनंतर हिडकल जलाशयातून बाहेर आलं मोठं रहस्य; पाणी आटताच समोर आला थरारक इतिहास, 'या' किल्ल्याची स्थापत्यकला पाहून थक्क व्हाल

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : संजय दिना पाटलांच्या मनात पत्रकारांबाबत कुठलाही राग नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

SCROLL FOR NEXT