Cm Eknath Shinde Criticizes Shivsena Chief Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

सकाळ डिजिटल टीम

सत्तासंघर्ष झाल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद टोकाला गेले आहेत. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात असं म्हटलं आहे. (Cm Eknath Shinde Criticizes Shivsena Chief Uddhav Thackeray)

भारतीय जैन महामंडळाचा विश्वमैत्री दिवस कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. फक्त घरात बसून काहीच होत नाही असा खोचक टोमणा मारत क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं, मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात. अस शिंदे यावेळी म्हणाले.

नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले?

कष्ट करा काहीही करा पण नशिबाची साथ नसेल तर काहीच होत नाही. पण कष्ट करण्याचं काम आपलं आहे. ते तर करावंच लागेल. नाहीतर नशिबात सगळं आहे. मात्र, कष्ट नाही केले तर काहीच होणार नाही, नुसतं घरी बसून काहीच होत नाही. असा खोचक टोमणा त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना मारला.

तसेच, कुणालातरी माफ करणे ही साधी गोष्ट नाही, त्यासाठी मोठं मन लागतं. साधत मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात. असा टोलाही शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कारण बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Raksha Andolan: राम मंदिर देणगीप्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार! महाराष्ट्रातून 'राम रक्षा आंदोलना'ची घोषणा; कुठून सुरूवात होणार?

ITR Deadline 2026: जुलैमध्ये चुकवू नका या 3 महत्त्वाच्या टॅक्स डेडलाइन! नाहीतर भरावा लागू शकतो दंड

Latest Marathi News Live Update : मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी 2 दिवस रेड अलर्ट जारी

Pune News: बालकांच्या आरोग्यासाठी विधानसभेत आवाज; हानिकारक पेये आणि भेसळीवर सरकारची मोठी घोषणा, आ. राहुल कुल यांच्या मागणीला यश

Pregnant Woman Rescue : टाकळीतील गर्भवतीचा जीवघेणा प्रवास! सुरुवातीला बांबूची झोळी, नंतर मालवाहतूक गाडी; शेवटी रुग्णवाहिकेतून दवाखान्यात

SCROLL FOR NEXT