Maharashtra Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या पोटातलं आलं ओठावर? 'त्या' वाक्याने चर्चेला उधाण

एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य अन् राज्यात चर्चेला उधाण

सकाळ डिजिटल टीम

राजकीय वर्तुळात सध्या मुख्यमंत्री शिंदेंच्या पोटातलं ओठावर आल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. यामागचं कारणही तसेच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.(CM Eknath Shinde Devendra Fadnavis Favorite Chief minister of Maharashtra )

एका भाषणात सुरुवातीला उल्लेख करताना एकनाथ शिंदे यांनी ‘ राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी. असा उल्लेख केला. शिंदे यांच्या या वक्तव्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. गोरेगाव येथील कोकण महोत्सवादरम्यान एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पाहत नसून ते उपमुख्यमंत्री आहेत अन् देवेंद्र फडणीवस हे मुख्यमंत्री आहेत, असे टोमणे वारंवार विरोधकांकडून लगावले जातात. आता तर खुद्द एकनाथ शिंदे यांनीच हे वक्तव्य केल्याने आता विरोधकांच्या हातात आयतं कोलित सापडलं आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार अशी चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात आली.

शिंदेंच्या आमदारांच्या गटाने भाजपशी युती केली असल्याने राज्यातील सर्व निर्णय भाजपच्याच मतानुसार होतात, एकनाथ शिंदे फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT