eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

मुंबई, पुणे, ठाण्यातील प्रदूषणात वाढ! CM शिंदेंचा 'मास्टर प्लॅन'; जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना

राज्यात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रदूषणाबाबत महत्त्वाची आढावा बैठक घेतली.

कार्तिक पुजारी

मुंबई- राज्यात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रदूषणाबाबत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यातील सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करा. जे लागेल ते पुरवलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.

मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दररोज मुंबईत सर्व प्रकारचे रस्ते धुण्यात यावेत असे निर्देश महापालिकेला दिले आहेत. तसेच आवश्यक भासल्यास आणखी फॉगर वापरता येतील. जे जे आवश्यक आहे, मशिन्स लागणार असतील तर त्या वापरण्याचे आदेश संपूर्ण राज्यातील महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पर्यटन विभागाला देखील दररोज लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.

प्रदूषणांचं प्रमाण युद्ध पातळीवर कमी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी तात्काळ होईल आणि सर्व जनतेला दिलासा मिळेल. हायकोर्टाने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. पर्यावरण विभाग, आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली .हजारांच्या संख्येत पाण्याचे टँकर भाड्याने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व सूचनांचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असं शिंदे म्हणाले.

क्लाऊड शेडिंगच्या सूचना दिल्या आहेत. पण काल पाऊस पडल्यामुळे याची गरज वाटत नाही. अद्ययावत यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई, पुणे ठाण्यात प्रदूषण वाढलं आहे. त्यामुळे आवश्यक ती तयारी करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान, देशभरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्लीची हवा अत्यंत वाईट या प्रकारात गेली आहे. दुसरीकडे मुंबई, पुणे शहरातही हवेचा दर्जा खालावला आहे. (Latest Marathi New)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT