पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उद्या आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या महापूजेसाठी रवाना झाले आहेत. ते दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते आणि आज ते पंढरपूरला गेले आहेत. आज मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा होणार असून दिल्लीहून येताना काही काळासाठी ते पुण्यात थांबले होते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आहे. (CM Eknath Shinde And Shivsena)
या धावत्या भेटीनंतर पुणे शहरातील शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचे महाराष्ट्र सहसंघटक किरण साळी उद्या देणार आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडे ते आपला राजीनामा देणार आहेत. त्याचबरोबर पुणे शहराचे सह संपर्क प्रमुख अजय भोसले हे देखील राजीनामा देणार आहेत त्यामुळे पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. याआधी देखील शिवसेना पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची महत्त्वाची बातमी सकाळने प्रसिद्ध केली होती.
दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून पुण्याला आले होते. दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना पांडुरंगाची मुर्ती भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते. पुण्यात आल्यावर त्यांचे शिंदेशाही पगडी घालून आज पुणे विमानतळावर स्वागत करण्यात आले आहे. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, किरण साळी, अजय भोसले, विजय शिवतारे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.