cm eknath shinde and dcm devendra fadanvis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra fadanvis: फडणवीसांचा 'मी पुन्हा येणार'चा व्हिडिओ चर्चेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

कार्तिक पुजारी

मुंबई- महाराष्ट्र भाजपने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. मी हा व्हिडिओ पाहिलेला नाही, असं ते म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ पाहिला नाही, असं म्हणत सावध भूमिका घेतली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने असा व्हिडिओ का ट्विट केला हे त्यांच्या नेत्यांना विचारावे लागेल, असं मंत्री उदय सामंत म्हणाले. भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं, की एका ट्विटवरुन काहीही संकेत दिले जात नाहीत. यातून कोणताही संदेश देण्यात आलेला नाही.

विरोधकांकडूनही या व्हिडिओवर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे राज्यामध्ये आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीमध्ये काही चर्चा झाली असेल. त्यामुळे भाजपकडून असा व्हिडिओ ट्विट करण्यात आला असावा. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT