Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 'ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार'; शिंदे गटातील आमदाराच्या दाव्याने खळबळ

'आता वेळ तुमची येणार आहे, तुम्हाला तुरुंगात जावेच लागणार आहे', असा इशारा शिंदे गटातील आमदाराने दिलाय

अंकिता खाणे (Ankita Khane)

केंद्रातील विविध तपास यंत्रणा महाराष्ट्रात विविध प्रकरणांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार कारवाया करत असताना, आता ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. कोरोना घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीकडे साक्ष दिली आहे.

'ईडीने जबरदस्तीने, धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचे सुजीत पाटकर यांनी जबाबात म्हटले आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ‘यांना उगाच चौकशीसाठी बोलावले का? मारून मुटकून आरोप सिद्ध करता येत नाहीत. गुन्ह्यात अडकल्याचे पुरावे असतील तरच शिक्षा होते.'

'तुम्ही खून जरी केला असेल पण पुरावे नसतील तर न्यायालय सोडते ना? पुरावा असेल तर तुम्हाला कुठेही माफी मिळत नाही. त्यामुळे याचिका दाखल करून काहीच होत नाही. त्यामुळे त्यांना मदत करणारे जे कोणी असेल तर त्यांना सांगतो की आता वेळ तुमची येणार आहे. तुम्हाला तुरुंगात जावेच लागणार आहे,' असा इशारा शिरसाट यांनी दिला आहे.

दरम्यान, कोण तुरुंगात जाणार असे शिरसाट यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी थेट नावेच घेतली. ते म्हणाले की, ‘यात सर्वच आहेत. संजय राऊत असेल, अनिल परब असेल.’ ठाकरे कुटुंबातील कोणीही असेल तरी ते आत जाणारच असा दावा त्यांनी यावेळी संजय शिरसाट बोलताना केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT