CM Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : परदेशी कशाला जायचं? गड्या आपला गाव बरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गाव दाखवत लोकसभा निवडणुकीनंतर परदेशात गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून टीका केली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गाव दाखवत लोकसभा निवडणुकीनंतर परदेशात गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून टीका केली आहे. त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.

यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. तसेच ‘परदेशी कशाला जायचं. गड्या आपला गाव बरा... शेत पिकांची दुनिया न्यारी, वसे जिथे विठूरायाची पंढरी’, असे शिंदे यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात  लोकसभा  निवडणुकीच्या पाचही टप्प्यातील मतदान पार पडले आहे आणि येत्या चार जून रोजी निकाल समोर येणार आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता उन्हा-तान्हात जोरदार प्रचार केला होता.

आता लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावी काहीसा विसावा घेतला आहे तर उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यावरून समाजमाध्यमांतही चांगलीच चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT