uddhav thackeray  uddhav thackeray
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : सेना भवनात उद्धव ठाकरेंनी थेट बापच काढला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ले देखील केले जात आहेत. दरम्यान आज शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवन येथे पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, सेनेच्या बापाच्या नावे मागू नका, आधी नाथ होते आता दास झाले, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांचा बापच काढला.

दरम्यान शिवसेना हिंदुदृदयसम्राट यांचीच आहे आणि राहील असे, या बैठकीत सांगण्यात आले. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होणार नाही. ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली, ते कोणत्याही पदावर असो, त्यांच्यावर तत्काळ कोणतीही कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना, या बैठकीत देण्यात आले आहेत. यासंबंधीचा ठराव आजच्या बैठकीत करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरें यांचं नाव कोणालाही वापरता येणार नाही. कोणताही बेईमान स्वार्थासाठी हे करता येणार नाही. जर तुम्हाला मतं मागायची आहेत. तर तुमच्या बापाच्या नावे मागा...सेनेच्या बापाच्या नावे मागू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण सहा ठराव पास झाले आहेत.

या कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेशी गद्दारी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकारिणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे असा ठराव ही या मंजूर करण्यात आला. हा ठराव शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडला होता. त्यामुळे बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे देण्यात आले आहेत, यामुळे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांवर कारवाई करणार आहेत.

एकनाथ शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असे ठरवले आहे.एकनाथ शिंदे यांचा गट वारंवार खरी शिवसेना आमची असल्याचं सांगत आहे. आज संध्याकाळी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', असं या नव्या गटाचं नाव असणार आहे. यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव इतर कोणालाही वापरता येणार नाही असा ठराव देखील आज मंजूर करण्यात आला, तसेच याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, सेनेच्या बापाच्या नावे मागू नका, असे सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT