Omicron : CM Uddhav Thackeray
Omicron : CM Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र

पुन्हा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

सकाळ डिजिटल टीम

राज्यातली कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातले निर्बंध शिथिल केले होते. मात्र आता पुन्हा एकदा राज्यातली रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. (Covid-19 Updates in Maharashtra)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्य कोविड टास्क फोर्सची (Maharashtra Covid Task Force) बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यातले रुग्ण वाढल्यास मास्क बंधनकारक करण्याचा विचार करावा लागेल, असं विधान अजित पवारांनी (Deputy CM Ajit Pawar) केलं होतं.

त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे राज्यातले निर्बंध शिथिलच राहणार की आणखी कडक होणार, याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बुधवारी संध्याकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार २४ तासात राज्यात हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सध्या ९८.०७ टक्क्यांवर गेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT