cm Uddhav Thackeray Praised Yashomati thakur and women who worked during Corona  
महाराष्ट्र बातम्या

CM उध्दव ठाकरेंकडून स्त्रीशक्तीचं कौतुक; म्हणाले, "बोलायला काय ठेवलंय.."

सकाळ डिजिटल टीम

आज जगभरात जागतिक महिला दिनानिमीत्त आयोजन कार्यक्रमात बोलताना यशोमती ताई मी तुमचं भाषण ऐकलं, तुम्ही बोलायला काहीच ठेवलं नाही.. आता इतक्या महिला पुढे आल्या आहेत की, पुरुषांना काम करायाला काही शिल्लकचं ठेवत नाहीयेत, याचा सार्थ अभिमान आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी समाजातील कर्तुत्वान महिलांचे कौतुक केले. आज जागतीक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन हजेरी लावली त्याप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांना जगभर दुय्यम स्थान देण्यात येत होतं, त्यात्या वेळेला महिलांनी त्याविरोधात आवाज उठवला होता, आपल्याकडे देखील सुध्दा सावित्रीबाई त्याआधी अहिल्यादेवी होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांना शक्य होतं ते समर्थपणे केलं, पुरुषांच्या बरोबरीने नव्हे एक पाऊल म्हणून काम केलं कदाचीत एक पाऊल पुढे टाकून केलं. अहिल्यादेवींनी राज्यकारभर करताना ज्या गोष्टी केल्या त्या आपण करतोय त्यापैकी राहिलेल्या काही गोष्टी असतील तर त्या राज्याच्या धोरणात सामिल करता येतील, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना यशोमती ठाकूर यांच्या कामाचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या मंत्रीमंडळातील प्रत्येक बैठकित त्या महिला व बाल विकासबाबत मुद्दे मांडतात. एकही अशी बैठक नाही ज्यात यशोमतीजी महिला व बाल विकासाबाबत बोलत नाहीत. तुम्ही ज्या पध्दतीने काम करता ती तळमळ बघीतल्यानंतर मला खात्री आहे की, आपलं धोरण राज्यातलं पहिलं अथवा एकमेवं धोर असेल ज्यामध्ये सर्वसमावेशक गोष्टींचा उल्लेख केला गेला असेल, असेही ते म्हणाले.

मुंबई पोलिस आयुक्तानी मुंबईच्या पोलिस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आठ तास केले आहेत, या सर्व माताभगिणी कोरोना काळातही रस्त्यावर उतरून कुटुंबाची काळजी न करता काम करत होत्या त्यांना, अशा मातांना माझा त्रीवार मानाचा मुजरा असे मुख्यमंत्री म्हणाले.

समाज, जग घडवण्याचं काम मात एक महिला करत असते. चूल आणि मूल याच्यापलिकडे जाऊन पुरुषाचा बरोबरीने पुढे पाऊल टाकत आहेत, त्यांना आपण त्याना पाठिंबा देण गरजेचे आहे. आपण बऱ्याच योजना कायदे केले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत का हे पाहणे, त्याची त्यांना जाणीव करुन देण्याची गरज आहे. राज्यसरकारचे अनेक उपक्रम महिलांपर्यंत पोहचलेत का? सार्वजनिक आयुष्यात आपण त्यांना काय सुविधा देतोय याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

चूल आणि मुलची व्याख्या बदलून महिला पुरूषांच्य खांदाला-खांदा लावून काम करत आहेत. दरम्यान राज्यसरकारचे अनेक उपक्रम महिलांपर्यंत पोहचलेत का? सार्वजनिक आयुष्यात आपण त्यांना काय सुविधा देतोय अशा एक ना अनेक गोष्टी आपण करतो. पण त्यांना समजवून सांगायची गरज आहे. या महिलांना फक्त आधार देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

महिला कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, त्यांना फक्त आधार देण्याची गरज आहे. सगळ्या क्षेत्रातील महिला घर आणि देश दोन्ही सांभाळतात ही कर्तृत्वाची मोठी झेप आहे असे सांगून ज्या-ज्या मागण्या असील त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न करु असे अश्वासान देत मुख्यमंत्र्यानी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT