Temperature 
महाराष्ट्र बातम्या

बर्फाळ वाऱ्याने महाराष्ट्र गारठला!

सकाळवृत्तसेवा

पुणे - पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हलक्या पावसाने हजेरी लावली. तर उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. 

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात चढ - उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडून येणारे थंड वारे, पूर्वेकडील उष्ण व बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात गुरुवारपासून हलक्या पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी झालेल्या गारपिटीने पिकांचे नुकसानही झाले. रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली येथे १७.४ मिलीमीटर, तर चंद्रपूरात २.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात हलके ढग जमा झाले होते. तर उत्तर महाराष्ट्रात गारठा चांगला वाढला होता. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ६.६ अंश सेल्सिअस तर नाशिक मध्ये ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही तापमानात घट झाली असून, किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. पश्चिमी चक्रावातामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हीमवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश परिसरामध्ये किमान तापमानात ४ ते ५ अंशांची घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पिकअप उलटून भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू, २० जण गंभीर जखमी; घटनास्थळी मृतदेहांचा खच

Earthquake in Ladakh: लडाखमध्ये पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? 150 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

SCROLL FOR NEXT