11th Admission Esakal
महाराष्ट्र बातम्या

अकरावीच्या विद्यार्थ्यांचे कॉलेज आजपासून सुरू! प्रवेश कमी झाल्याने शिक्षक चिंतेत; राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक प्रवेशफेरी; 'त्या' तुकड्यांना लागणार कुलूप

11th Admission Process: इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेनंतर सोमवारीपासून सोलापूर जिल्ह्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित सुरू होणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेनंतर सोमवारपासून (ता. ११) सोलापूर जिल्ह्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित सुरू होणार आहेत. तरीपण, १२ ऑगस्ट रोजी रिक्त राहिलेल्या प्रवेशाच्या जागा प्रसिद्ध करून दोन दिवसांनी प्रवेशासाठी आणखी एक विशेष फेरी राबविली जाणार आहे.

राज्यातील सुमारे २२ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले, पण त्यापैकी १४ लाख विद्यार्थ्यांनीच अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली. त्यापैकी १२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अजूनही नोंदणी केलेल्या दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले नाहीत. त्यांच्यासाठी कॉलेजनिहाय रिक्त राहिलेल्या प्रवेशाच्या जागा मंगळवारी (ता. १२) ऑनलाइन प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रवेशाची विशेष फेरी जाहीर करून २० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहेत.

दरम्यान, ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ३० ते ४० टक्केसुद्धा प्रवेश झालेले नाहीत, त्याची माहिती संकलित केली जाणार आहे. शालेय शिक्षण संचालक स्तरावर त्याची कारणे शोधली जाणार आहेत. कला व वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांनी यंदा पाठ फिरविल्याची स्थिती असून अनेक जिल्ह्यांमध्ये विज्ञान शाखेचे मोठ्या प्रमाणावर प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यासाठी विशेष नियोजन करून अभ्यासक्रमात बदल करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रवेश क्षमता

  • शाखा प्रवेश क्षमता

  • कला ३१,६८०

  • वाणिज्य १३,६२०

  • विज्ञान ३३,४८०

  • एकूण ७८,७८०

...त्या तुकड्यांना लागणार कुलूप

अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन राबविण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीच्या महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमधील तुकड्यांना पुरेसे प्रवेशच मिळालेले नाहीत. विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यिता तत्त्वावरील तुकड्या बंद होतील आणि अनुदानित तुकड्यांवरील शिक्षक दुसरीकडे समायोजित करावे लागणार आहेत. कारण, सलग तीन वर्षे त्या तुकड्यांमध्ये निकषांनुसार पुरेशा प्रमाणात प्रवेश न झाल्यास त्या बंद केल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Fraud Tantrik : कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर..., चुटकी वाजवून भूतबाधा करणाऱ्या मांत्रिकाचा कारनामा उघड; जिल्ह्यावर वचक ठेवायचां प्रयत्न...

Type 5 Diabetes Global Recognition: मधुमेहाच्या नव्या प्रकार; ‘टाइप ५’ मधुमेहाला आता जगभर अधिकृत मान्यता

राग, निराशा अन्‌ हतबलता वाढतेय! ISL सुरू करण्यासाठी भारतीय फुटबॉलपटूंची आर्त हाक...

Latest Marathi Breaking News : मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

धक्कादायक घटना! '१६ वर्षीय मुलाने घेतला गळफास'; बार्शी तालुक्यातील घटना, शाळेतून दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर घरी अन्..

SCROLL FOR NEXT