महाराष्ट्र

साडेतीन हजार पदे भरण्यास मान्यता

सकाळवृत्तसेवा

पुणे - उच्च शिक्षण विभागातील पदांचा नवा आकृतिबंध तयार करण्यात आला असून, राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर मिळून १८ हजारांहून अधिकपदे रिक्त आहेत. त्यातील ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालकांची सर्व, तर अध्यापकांची काही पदे अशी सुमारे साडेतीन हजार पदे भरण्यास उच्चस्तरीय समितीने तत्त्वत: मान्यता दिली आहे.

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील पदांची रचना ही १९९८ च्या विद्यार्थी संख्येनुसार करण्यात आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी संख्येत वाढ झाली. पण पदे वाढविण्यात आली नाही, त्यासाठी नवा आकृतीबंधही तयार करण्यात आला नाही. त्यात अध्यापक वा कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्या वाढत होती. भरतीबंदी असल्याने या पदांवर नियुक्तीचा प्रश्‍न शिक्षण संस्थांना भेडसावत होता. भरतीबाबत सातत्याने मागणी होऊ लागल्याने राज्यातील सर्वच खात्यांना आकृतीबंध तयार करण्यास सूचित करण्यात आले होते.

रिक्त पदांवरील भरतीबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीदेखील नियुक्त करण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाचा नवा आकृतीबंध पुण्यातील संचालनालयाने तयार करून या समितीला सादर केला आहे. त्यानुसार या विभागातील रिक्त पदांची संख्या १८ हजार ३०९ आहे.

संचालनालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीच्या तीन बैठका झालेल्या आहेत. नुकतीच चार दिवसांपूर्वी एक बैठक झाली असून, तीत शिक्षक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदे भरण्यास मान्यता दिली आहे. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात भरतीसंबंधी शासन निर्णय जारी होईल, असे या सूत्रांनी सांगितले.

शिक्षकीय पदांच्या भरतीबाबत उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आहे. त्यातील निर्णयांचे इतिवृत्त अद्याप तयार व्हायचे आहे. ते काम दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर भरती किती प्रमाणात होईल, हे जाहीर केले जाईल.
- सौरभ विजय, प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 7 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT