नवी महाविद्यालये sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात यंदा १,३३८ नवी महाविद्यालये

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील ११ विद्यापीठांतर्गत यंदा पदवी, पदव्युत्तर आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम देणाऱ्या तब्बल एक हजार ३३८ नव्या महाविद्यालयांची भर पडणार आहे. यासाठी नुकतेच महाराष्ट्र राज्य शिक्षण व विकास आयोगाने (माहेड) २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक बृहत् आराखड्याला मान्यता दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले इरादा पत्र आणि अंतिम मान्यता देण्यासाठी ३० एप्रिल ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यासाठी विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयकही मंजूर केले होते. त्या पार्श्वभूमीवर नव्या महाविद्यालयांसाठी ‘माहेड’कडून बृहत् आराखड्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर आता विद्यापीठांकडून त्याबाबत जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. नव्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रमाण अधिक आहे.

नव्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आहे. मुंबई विद्यापीठाने २५५, त्यापाठोपाठ एसएनडीटी महाविद्यालयाने २०३, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १६५ नवी महाविद्यालये सुरू करण्यासाठीची बिंदू नामावली दिली आहे. यामध्ये विधी, फॅशन डिझाइन, औषधनिर्माण (फार्मसी) अभ्यासक्रमासोबतच विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दुसरीकडे शहरी भागात मराठी माध्यमांसोबत पारंपरिक कला शाखेच्या नव्या महाविद्यालयांकडे मागणी घटली असल्याचेही समोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Accident: शाळेतून परतताना काळाचा घाला, विविध घटनेत २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; दोन घरांत दुःखाचा डोंगर

IND vs AFG : संजू सॅमसन IN, अभिषेक शर्मा OUT! अफगाणिस्तानविरुद्ध कसा असेल भारतीय संघ? वाचा कोण येणार, कोण जाणार...

Pune Flashlight Collector: पुण्यातील अवलियाकडे टॉर्चचा खजिना; १२०० दुर्मीळ फ्लॅशलाइट्सची केंद्र सरकारने घेतली दखल, टॉर्चप्रेमाची अनोखी कहाणी!

Marathi News Live Updates : राहुल गांधींच्या भूमिकेमुळे INDIA आघाडी मजबूत होईल; तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय

High Court: 'हिजाब घालणे' इस्लामिक श्रद्धेचा अनिवार्य भाग नाही; हायकोर्टाचा मोठा निकाल, याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT