11th-12th college sakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षणाधिकाऱ्यांकडून आता महाविद्यालयांची तपासणी! क्लासच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांचे ग्रामीणमध्ये सर्वाधिक प्रवेश; बायोमेट्रिक हजेरी अन्‌ प्रत्येक परीक्षा केंद्रावर आता सरमिसळ पद्धत

खासगी क्लास बुडू नयेत म्हणून हजारो विद्यार्थ्यांनी शहराकडे पाठ फिरवत ग्रामीणमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर आता विज्ञान शाखेच्या अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन घालण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : खासगी क्लास बुडू नयेत म्हणून हजारो विद्यार्थ्यांनी शहराकडे पाठ फिरवत ग्रामीणमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर आता विज्ञान शाखेच्या अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन घालण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड व महाविद्यालयांची प्रवेश क्षमता व दिलेले प्रवेश, या बाबींची पडताळणी होणार आहे.

डीएड, बीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने यंदा दहावीत ६५-७० टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचीही पसंती विज्ञान शाखेला असल्याचे दिसून आले. मात्र, अलीकडे अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा आणि कॉलेजला नुसते परीक्षेपुरतेच जायचे व नियमित खासगी क्लासला उपस्थित राहायचे, असा नवा पॅटर्न सुरू झाला आहे.

कॉलेजमधील उपस्थिती कमी, पण खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी, अशी वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे. नीट, जेईई, सीईटीच्या तयारीसाठी विज्ञान शाखेतील बहुतेक विद्यार्थी दररोज खासगी क्लासेसमध्ये उपस्थित राहातात. सोलापूर शहर-जिल्ह्यात देखील अशीच स्थिती असून त्याच्या पडताळणीसाठी आता माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप टप्प्याटप्प्याने अचानकपणे जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. त्यावेळी अकरावी आणि बारावीच्या विशेषत: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासणार आहेत.

प्रत्येक केंद्रांवर आता सरमिसळ पद्धत

ज्याप्रमाणे शहरातील अनेक विद्यार्थी क्लासेसच्या सोयीसाठी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी- बारावीत प्रवेश घेत आहेत, त्याच पद्धतीने ज्या परीक्षा केंद्रांवर सरमिसळ पद्धत नाही, अशा केंद्राअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असल्याचेही निरीक्षण बोर्डाने नोंदविले आहे. त्यामुळे आता आगामी परीक्षेसाठी सर्वच केंद्रांमध्ये सरमिसळ पद्धत लागू होणार आहे. तसा प्रस्ताव बोर्डाने तयार केला असून तो कॉपीमुक्त परीक्षेचा पॅटर्न राज्यभर लागू केला जाईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. याशिवाय सर्वच परीक्षा केंद्रांवर आता सीसीटीव्ही कॅमेरेही असणार आहे.

सीसीटीव्ही अन्‌ विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरीचे बंधन

जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ ते ३१ ऑगस्टपर्यंत गुणवत्ता विकास अभियान राबविले जाणार आहे. त्यावेळी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता व प्रत्यक्षातील प्रवेश आणि त्याठिकाणी सीसीटीव्ही आहेत का, विज्ञान शाखेतील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू आहे का, या बाबींची देखील पडताळणी होईल. तशी व्यवस्था नसलेल्या महाविद्यालयांना काही दिवसांची मुदत दिली जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती

  • एकूण कनिष्ठ महाविद्यालये

  • अंदाजे ६००

  • सर्व शाखांची प्रवेश क्षमता

  • ७२,५००

  • विज्ञान शाखेचे विद्यार्थी

  • ३२,०००

  • परीक्षा केंद्रे

  • १०४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT