College Student 
महाराष्ट्र बातम्या

तब्बल नऊ महिन्यानंतर महाविद्यालये होणार सुरु

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे तब्बल नऊ महिने बंद असणारी महाविद्याले आता खुली होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) कोरोनानंतरच्या काळात देशातील विद्यापीठ व महाविद्यालये सुरु करण्याबाबत सविस्तर नियमावली व मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या असून त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सुरू केली जाणार असल्याचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनातर्फे गुरुवारी रात्री प्रसिद्ध काढण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यासह देशातील बहुतांश विद्यापीठे व महाविद्यालये कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये ,नऊ महिन्यापासून बंद ठेवण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करावे, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्या होत्या.त्यानुसार विविध शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करण्याबाबत मागणी केली जात होती. या पार्श्वभुमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने अखेर देशातील विद्यापीठे व महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर नियमावली व मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सुरू केली जाणार असल्याचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आयोगाने केलेल्या सुचनानुसार, सध्या वर्गात 50 टक्के विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यासंदर्भात महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने व शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून विद्यापीठ व महाविद्यालय सुरू करावीत, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या सूचना : 
- विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा.
- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासंदर्भात शैक्षणिक संस्थांनी जागृती करावी.
- महाविद्यालयातील वर्गामध्ये पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवून शिकवण्याची प्रक्रिया सुरू करावी.
- महाविद्यालयात अनोळखी व्यक्तींना प्रवेश करू देऊ नये.
- विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ओळख पत्राशिवाय शैक्षणिक संकुलात प्रवेश देऊ नये.
- महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये मास्क बंधनकारक करावा तसेच फिजीकल डिस्टन्स नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- वसतिगृह प्रयोगशाळा उपहारगृह याबाबत आवश्यक काळजी घ्यावी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रकला धडकल्यानंतर पेटली बस, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू; २२ जण जखमी

Vijaya Mehta : रंगभूमीचा दीपस्तंभ निमाला! ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT