Rajesh-Tope
Rajesh-Tope sakal
महाराष्ट्र

आरोग्य भरतीत गोंधळ : न्यासा ब्लॅकलिस्ट करण्याच्या हालचाली

सम्राट कदम

पुणे ः राज्यातील आरोग्य भरती करणारी खासगी वादग्रस्त कंपनी ‘न्यासा कम्युनिकेशन्स’ लवकरच ब्लॅकलिस्ट करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून ‘सकाळ’ला मिळाली आहे. मात्र याच वेळी आरोग्यसेवेतील गट क आणि ड ची पदभरती न्यासाकडूनच होणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये भरती प्रक्रियेत गोंधळ केला म्हणून न्यासा कंपनीवर ठपका आहे. गैरव्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या या वादग्रस्त कंपनीकडेच राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागातील गट क आणि ड च्या भरती प्रक्रियेसाठी कंत्राट दिले. फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या आरोग्य भरतीतही मास कॉपी, मिरीटलिस्ट न लागणे आणि प्रचंड गैरव्यवहारांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावेळी चौकशी करून पुढील कारवाई करू असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही ही पदभरती कोणत्याच चौकशीविना झाल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

मागील महिन्यात आयोजित आरोग्यसेवेतील पदभरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला. उमेदवारांना चुकीचे प्रवेशपत्र किंवा प्रवेशपत्र न मिळणे आदी तक्रारी आल्या होत्या. प्रत्यक्ष लेखी परीक्षा घेण्यासाठी आवश्यक केंद्रांची कमतरता, उत्तरप्रदेशपासून चीनच्या वूहाण प्रांतातील पिनकोड प्रवेशपत्रावर देण्यात आला होता. राज्यातील आठ लाख ६० हजार उमेदवारांच्या भवितव्य निश्चित करणारी ही लेखी परीक्षा प्रचंड अनागोंदीमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना स्वतः माध्यमांपुढे येत पुढे ढकलावी लागली होती.

भरती प्रक्रियेतील प्रचंड गोंधळ, उमेदवारांचा संताप आणि सकाळ-सामने केलेल्या वृत्तांकनानंतर राज्य मंत्रिमंडळात न्यासा कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची हालचाल चालू आहे. मात्र अजूनही सध्याची आरोग्यभरती याच कंपनीमार्फत घेण्यावर राज्य शासन ठाम असल्याचे सूत्रांकडून समजले.

उमेदवारांच्या डेटाचा प्रश्न ः

सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग, लोहमार्ग पोलिस आदी भरत्यांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले होते. मोबाईल नंबर, फोटो, पत्ता, वय, इ-मेल आयडी, बॅंक ट्रान्झॅक्शन आदी संवेदनशिल डेटा न्यासा कंपनीकडे आहे. या डेटाची सुरक्षिततेसंबंधी उमेदवारांना शंका आहे. या डेटाचा गैरवापर झाल्यास याचा थेट फटका सर्वसामान्य उमेदवारांना बसणार आहे. सरकारने याच्या सुरक्षेसंदर्भात कडक नियम करावेत असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT