Sharad pawar 
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रीय राजकारणात उलथापालथ! काँग्रेसला पवारांवर विश्वास नाही? आता नितीशकुमारांची एन्ट्री...

Sandip Kapde

अदानी प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या महाविकास आघाडीत नाराजी आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील नाराज आहेत. त्यामुळे युपीएमध्ये शरद पवार यांना बाजूला करण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्याची जबाबदारी नितीशकुमार यांच्याकडे देण्यात आली आहे. आधी ही जबाबदारी शरद पवार यांच्याकडे असायची. शरद पवारांनी हाक देली तर विरोधक एकत्र यायचे मात्र आता नितीशकुमार यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसचा आता शरद पवारांवर विश्वास राहिलेला नाही, अशी चर्चा देखील होत आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत यूपीएच्या निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली तर ही माहिती भाजपला मिू फुटू शकते, अशी भीती काँग्रेसला असल्याची माहिती इंडिया टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

शरद पवार निश्चितपणे यूपीएचा भाग राहतील. पण महत्त्वाच्या धोरणात्मक चर्चेत त्यांचा समावेश होणार नाही, असा निर्णय काँग्रेसने घेतल्याची चर्चा आहे. नितीशकुमार हे सर्व प्रादेशिक पक्षांमधील समन्वयक म्हणून काम पाहतील. नितीशकुमार हे अनुभवी नेते आहेत, त्यांचे सर्व प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेसला यूपीएसाठी घ्यायचा आहे.

या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज (गुरूवार) दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. शरद पवार दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना भेटणार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल स्वतः मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. नितीशकुमार यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करून काँग्रेसने राष्ट्रवादीला संदेश दिल्याची चर्चा आहे. शरद पवार हे देशातील सर्वात मोठे नेते आहेत आणि ते सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचे काम करू शकतात. मात्र काँग्रेसने ही जबाबदारी नितिशकुमारांना दिली आहे.

शरद पवार विरोधकांचे महत्त्वाचे मुद्दे फेटाळून लावत असल्यामुळे भाजपला फायदा होत असल्याचे काँग्रसचे म्हणणे आहे. त्यामुळे राहुल गांधी देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT