Jayshree Jadhav Esakal
महाराष्ट्र बातम्या

पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार; काॅंग्रेसच्या जयश्री जाधवांची भूमिका

चंद्रकांत पाटील जयश्री जाधवांची घेतली होती भेट.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांची कोल्हापूरच्या विकासासाठी काही स्वप्ने होती. ती पूर्ण करण्यासाठी मी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांना विकासाच्या अनेक गोष्टी करायच्या होत्या त्या मी आगामी काळात पूर्ण करणार असल्याचे काॅग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी सांगितले. त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. काँग्रेसचे आमदार (कै.) चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री जाधव या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काॅंग्रेसला उमेदवारी दिल्याने शिवसेना नेत्याकडून नाराजीचा सुर उमटला आहे. या रणधुमाळीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकसंघपणे काम करणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज सांगितले. कोल्हापुरात भाजप आणि काॅग्रेसमध्ये चुरस होणार आहे. या निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी कोणता अजेंडा हाती घेतला आहे हे जाणून घेण्यासाठी साम टीव्हीचे ब्यूरो चिफ संभाजी थोरात यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी जयश्री जाधव म्हणाल्या, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझी भेट घेतली होती. त्यानी भाजपमधून निवडणूक लढावी असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र माझ्या पतीने जो झेंडा हाती घेतला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी काॅग्रसमधून उमेदवारी घेण्याचा निश्चय केला. आगामी काळात माझ्या पतीचे कोल्हापूर विकासाचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT