Satej Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर काँग्रेसचा दावा

एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर काँग्रेसने दावा केला आहे. ज्याप्रमाणे परिवहन मंत्री महामंडळाचे अध्यक्ष आहे.

प्रशांत कांबळे

मुंबई - एसटी महामंडळाच्या (ST Corporation) उपाध्यक्ष पदावर (Post of Vice President) काँग्रेसने (Congress) दावा (Claims) केला आहे. ज्याप्रमाणे परिवहन मंत्री महामंडळाचे अध्यक्ष आहे. त्याप्रमाणेच राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना महामंडळाचे उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची मागणी काँग्रेस प्रणित महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) (Intak) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. (Congress Claims the Post of Vice President of ST Corporation)

देशातील सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणाची सुविधा योग्यरित्या मिळावी म्हणून मार्ग परिवहन अधिनियम 1950 अन्वये एसटी महामंडळाची स्थापना झाली. त्यानुसार संचालक मंडळात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासह 17 संचालकांची नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्यात आले आहे. त्यानंतर परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष हे पद वेगवेगळ्या व्यक्तीकडे होती. मात्र, मार्च 2015 पासून महामंडळाच्या कार्यात गती आणण्यासाठी परिवहन मंत्री हेच महामंडळाचे अध्यक्ष अशी दुरुस्ती करण्यात आली आहे.

त्याप्रमाणेच परिवहन राज्यमंत्री त्यांच्याकडे आलेल्या सर्वसामान्य जनतेच्या आणि प्रवाशांच्या आणि कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी, प्रशासनात गती आणण्यासाठी आणि महामंडळाला फायद्यात आणण्यासाठी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. अध्यक्ष पदावर परिवहन मंत्री आणि उपाध्यक्ष पदावर राज्यमंत्री असल्यास एसटी महामंडळावर अंकुश ठेवता येणार असून, त्याचा फायदा महामंडळाला होईल आणि एसटी महामंडळाची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल असे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले आहे.

उपाध्यक्ष पदावर यापूर्वीही स्वतंत्र नेमणूक केली होती

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे मेव्हणे म्हणजेच विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांना 1995 च्या दरम्यान एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष हे पद एकत्र करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा उपाध्यक्ष पद स्वतंत्र करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT