vidhan-bhavan sakal media
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर काँग्रेसचा आक्षेप!

काँग्रेसनं राज्यपालांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि बहुमत चाचणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पण यांपैकी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर आता काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना हा कार्यक्रम मांडलाच कसा? असा सवाल करताना काँग्रेसनं विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आहे. (Congress objects to Assembly Speakers election in Maharashtra Legislature)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार आहोत. गरज पडल्यास आम्ही तीन अर्जही दाखल करु. पण याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पण अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल. पण खरंतर यामध्ये एक मुद्दा उपस्थित होतो की, यापूर्वी राज्यपालांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं निवडणूक घेता येणार नाही, असं पत्र महाविकास आघाडी सरकारला दिलं होतं. मग आता ते कोणत्या आधारे ही निवडणूक घेत आहेत?"

रोज संविधानिक व्यवस्थेचा खून करण्याच काम भाजप श्रेष्ठींकडून केलं जात आहे. ही चिंतेची बाब आहे. सत्ता कोणाची आहे, कोणाची नाही हे महत्वाचं नाही. पण अशा प्रकारे संविधानिक व्यवस्थेवर हल्ले होणं ही चिंतेची बाब आहे. लोकशाही आणि संविधानिक व्यवस्था जिवंत ठेवणं हीच लोकप्रतिनिधींची आणि सरकारची जबाबदारी असते, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT