Lok Sabha Election 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

मिशन लोकसभा! अंतर्गत वाद मिटवून काँग्रेस लागली तयारीला? मुंबईत बैठक, दिग्गज नेते राहणार उपस्थित

रुपेश नामदास

देशभरात लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या मध्ये महाराष्ट्रात देखील मविआ आणि भाजप-शिवसेनेने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. भाजप-शिवसेना महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरु आहे. तर काँग्रेसची २ आणि ३ जून रोजी मुंबईत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक पार पडणार आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची चाचपणी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची २ आणि ३ जून रोजी मुंबईत बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

२ आणि ३ जून रोजी होणाऱ्या बैठकीत सर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे असलेल्या मतदारसंघातही काँग्रेस चाचपणी करणार आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या चाचपणीसाठी काँग्रेसची बैठक होत आहे. ही बैठकीत लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष, आमदार, प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

दरम्यान मविआमध्ये अजून जागा वाटपावर कोणताही निर्णय झाला नाही. मात्र ४८ लोकसभा मतदारसंघावर जागा वाटपात मविआच्या प्रमुख नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या यांच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. भाजप २६ आणि शिवसेना २२ असा फॉम्युला ठरला असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि अभिषेक रांका चर्चेत सहभागी; सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा निघणार?

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT