sachin sawant 
महाराष्ट्र बातम्या

राजीनाम्यानंतर सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, चर्चांना उधाण

ओमकार वाबळे

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याची माहिती सुद्धा मिळत आहे. मात्र, आता सावंत मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षावर पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेट घेण्यासाठी ते दाखल झाले आहेत.

काँग्रेसने राज्यात कात टाकण्यासाठी नाना पटोले यांच्याकडे नेतृत्व दिलं. नव्या दमाच्या नेत्यांची फळी राज्यात उभी करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र, याच दरम्यान निष्ठावानांची नाराजी ओढावून घेण्यात काँग्रेसला अपयश आलं का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण सतत काँग्रेसची बाजू मांडणारे सचिन सावंत यांनी नाना पटोलेंच्या कारभारावर नाराजी दाखवून प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

पक्षांतर्गत गोष्टींमध्ये त्यांना डावलून अतुल लोंढे यांना पदं मिळत असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. त्यामुळे सावंतांनी राजीनामा दिला. त्यांनी लगेच ट्विटरवरून पदभार सोडल्याची माहिती दिली. त्यातच सचिन सावंत उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेल्याने आता राजकारणात आणखी ट्विस्ट पाहायला मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT