Corona Patients Sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात सक्रिय रुग्णांची झपाट्याने वाढ; 40 हजारांचा टप्पा पार!

सक्रिय रुग्णांपैकी 38 टक्के बाधित रुग्णालयात दाखल

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा (Corona active patients) वेगाने वाढत असून 42,024 वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांमध्ये (patients increases) 91.36 टक्के वाढ झाली आहे. त्यातील 38 टक्के बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 16,380 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे 26,112 (62.1%) रुग्ण आहेत. 5450 (12.58 %) रुग्ण गंभीर आहेत. (corona active patients increases speedily in Maharashtra more than forty thousand patients found)

गंभीर रुग्ण वाढल्याने आयसीयूमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आयसीयू मध्ये 5.61 टक्के म्हणजे साधारणता 2365 रुग्णांना आयसीयू ची गरज भासली आहे. सक्रिय रुग्णांपैकी व्हेंटिलेटरवर 2.35 टक्के म्हणजेच 990 रुग्ण तर ऑक्सिजन वर 3.26 टक्के म्हणजे साधारणता1375 रुग्ण आहेत. तर 7.9 टक्के म्हणजेच 2980 रुग्ण आयसीयू बाहेर ऑक्सिजन वर आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले क्षेत्र

मुंबई - 29,819

ठाणे - 4669

पुणे - 3274

पालघर - 806

रायगड - 746

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT