corona_20esakal sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोना निर्बंध आणखी कठोर; काय सुरु? काय बंद?

राज्यातील कोरोना रुग्ण वाढ थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- राज्यातील कोरोना रुग्ण वाढ थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 15 एप्रिलपासून 1 मेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण, तरीही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. शिवाय नागरिक या नियमांचे काटेकोर पालन करत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने निर्बंधांमध्ये वाढ केली असून अत्यावश्यक सेवांच्या वेळेवर बंधन आणले आहेत. किराणा दुकान, भाजीपाला, दुध डेअरी अशा सेवा आता केवळ सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु राहतील.

या काळात काय सुरु राहील?

- किराणा दुकाने सकाळी ७ ते ११

-दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते १

-भाजीपाला विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११

-फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११

-अंडी, मटण, चिकन, मासे विक्री सकाळी ७ ते ११

-कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११

-पशुखाद्य विक्री सकाळी ७ ते ११

-पेट्रोल पंपावर खाजगी वाहनोकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/

एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११

-पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, मालवाहतूक

याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसारया

टॅक्सी, कंब, रिक्षा फक्त अत्यावशक सेवेकरिता चालू राहील.

-चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्यावशक सेवेकरिता

वापरास परवानगी राहील.

-दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तीना अत्यावशक सेवेकरिता

वापरास परवानगी राहील.

काय बंद असेल?

-हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल

मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.

-धार्मिक स्थळे पूर्णत बंद राहतील.

-सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.

-कटिंग सलून, स्पा, ब्यूटी पार्लर पूर्णत बंद राहतील.

-शैक्षणिक संस्था, सर्व खासगी शिकवणी वर्ग पूर्णत बंद राहतील.

-स्टेडियम मैदाने पूर्णता बंद राहतील.

-विवाह समारंभास बंदी राहील.

-चहाची टपरी, दुकाने पूर्णतः बंद राहतील

-अत्यावशक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णत बंद राहतील.

-सिनेमाहॉल, नाट्य गृह, सभागृह, संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.

-सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, कार्यक्रम पूर्णत बंद राहतील.

-सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णत बंद राहतील.

-सेतू ई-सेवा केंद्र, आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.

-व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग / एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.

-बेकरी, मिठाई दुकाने पूर्णत बंद राहतील

-आठवडे बाजार पूर्णता बंद राहतील.

दारू दुकाने पूर्णत बंद राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Fare Increase : इंधन दरवाढीचा फटका ! राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त ३ दिवस सुरु ठेवण्याची मागणी; सरकार काय निर्णय घेणार?

Bhandardara Kajwa Festival: काजवा महोत्सवासाठी कठोर नियमावली लागू, दररोज फक्त २ हजार जणांनाच परवानगी; काय आहेत नियम?

Jalgaon: बोगस दिव्यांगांना मिळणार सक्तीची निवृत्ती, झेडपी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

Jalgaon: मुलगा फोन उचलेना, शोधायला बाहेर पडला वृद्ध पिता; शोध घेताना लेकाचा मृतदेहच दिसला समोर, काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

China Dark Factory: चीनमधील ‘डार्क फॅक्टरी’त २४ × ७ उत्पादन; मानवाऐवजी रोबो करतात सर्व कामे; प्रमुख कंपन्यांचा पुढाकार..

SCROLL FOR NEXT