महाराष्ट्र बातम्या

कोरोनामुळे गणवेशाबरोबर विद्यार्थ्यांना आता मास्कही 

संतोष सिरसट

सोलापूर ः राज्यातील शाळा कधी सुरु होणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. कोरोनामुळे राज्यात सगळीकडे हाहाकार माजला आहे. कोरोना कमी झाल्यानंतर शाळा सुरु होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाबरोबरच विद्यार्थ्यांना मास्कही देण्यात येणार आहेत. तशा सूचना शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. 
शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातात. त्याची जबाबदारी शालेय व्यवस्थापन समितीवर दिलेली आहे. शालेय व्यवस्थापन समिती एखाद्या ठेकेदाराकडून गणवेशाची खरेदी करत असते. त्याचवेळी त्या ठेकेदाराकडून एका विद्यार्थ्यांसाठी दोन मास्क घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षात शाळा शेवटच्या टप्यात बंद करण्यात आल्या. पहिली ते नववी व अकरावीच्या वार्षिक परीक्षा रद्दा करण्यात आल्या. त्याचबरोबर दहावीचा भूगोल पेपरही रद्द करण्यात आला. कोरोनाचे वाढते प्रस्थ लक्षात घेता शासनाने हा निर्णय घेतला होता. तीन महिन्यानंतरही कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शाळांबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत सरकारही संभ्रमात आहे. नुकतीच पंढरपूर येथे संस्थाचालकांची बैठक झाली. त्या बैठकीत शाळा सुरु करण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे. त्याचबरोबर शिक्षण तज्ञांनीही अशा भीषण स्थितीत शाळा सुरु ठेवण्यास विरोध केला आहे. कोरोनाने आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही हातपाय पसरायला सुरवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची मानसिकता पालकांची नाही. त्यामुळे शाळा सुरु करुनही पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार का? याबाबतही संभ्रमावस्था आहे. अनेकांनी मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. शहरी भागातून ग्रामीण भागात अध्यापनाचे काम करण्यासाठी आलेले शिक्षक जर लहान मुलांच्या संपर्कात आले तर काय होणार याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक शिक्षण तज्ञांनी शाळा आताच सुरु न करता त्याबाबत जुलैनंतर निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: हपकिनच्या कामकाजाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, तुकाराम मुंडे यांच्याकडेच पदभार ठेवा: वळसे पाटील यांची विधिमंडळात मागणी

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT