maha_covid 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात दिवसभरात ५,१३२ रुग्णांची भर

दिवसभरात नव्या रुग्णांच्या दीडपट रुग्ण झाले बरे

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काहीशी भर पडली. त्या तुलनेत दीडपट रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मृतांची संख्याही सरासरी इतकी नोंदवली गेली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ५,१३२ नवे रुग्ण आढळून आले. तर ८,१९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात १५८ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यात सध्या ५८,०६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ६४,०६,३४५ वर पोहोचली आहे. तर आजवर राज्यात १,३५,४१३ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.

मुंबई शहराची कोरोना आकडेवारी

मुंबई शहरात दिवसभरात २८३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर २९७ रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आत्तापर्यंत ७,१८,९५५ बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरात सध्या सक्रीय रुग्ण २,६८६ आहेत. मुंबईचा रुग्ण दुपट्टीचा दर २०५७ दिवस आहे. तर कोविड वाढीचा दर ०.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

पुणे शहराची कोरोना आकडेवारी

पुणे शहरात दिवसभरात २६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर २१५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच पाच रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, शहरात २०२ गंभीर रुग्णांसह २०५५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT