corona update sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात नवीन रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण बरे

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पोहोचलं ९७.०६ टक्क्यांवर

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. आज 3,530 नवीन रुग्ण सापडले तर 3,685 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,12,706 इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.06 टक्के एवढं झालं आहे.

आज राज्यात सोमवारच्या तुलनेत नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काहीशी वाढली. आज 3,530 नवे रुग्ण सापडले असून काल 2,740 नव्या रुग्णांची भर पडली होती. मृत्यूचा आकडा 27 वरून वाढून 52 झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,38,221 इतका झाला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 49,671 इतकी झाली.

अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 12, नाशिक 11, पुणे 18, कोल्हापूर 6, लातूर 4, नागपूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,96,176 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 1,875 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT