Coronavirus
Coronavirus Google
महाराष्ट्र

राज्याला मोठा दिलासा! आढळले दोन वर्षातील सर्वात कमी रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाला (Coronavirus) सुरुवात झाल्यापासून गेल्या दोन वर्षात राज्यात आज सर्वात कमी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण राज्यभरात केवळ ९९ रुग्ण आढळून आले असून १८० रुग्ण बरे झाले आहेत. आज एकही मृत्यू झाला नाही. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. (corona update maharashtra daily corona news)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात गेल्या चोवीस तासात ९९ नवे कोरोना संसर्गबाधित रुग्ण आढळून आले असून १८० रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये एकही मृत्यू झालेला नाही. तसेच राज्यात सध्या १,२७३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

राज्यात आजवर ७७,२३,४६८ एकूण रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळं आजचा कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच दिवसभरात एकही मृत्यू न झाल्यानं राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट हा ०९.९७ टक्के आहे.

दरम्यान, राज्यात पुण्यात सध्या सर्वाधिक ३५८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत २९९ अॅक्टिव्ह रुग्ण तर तिसऱ्या क्रमांकावर ठाण्यात १५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच सर्वात कमी १ इतके अॅक्टव्ह रुग्ण सांगलीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT