Anil Deshmukh e sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या १०० कोटी वसुलीचे आरोप (Money Laundering case) आहेत. त्यासाठी त्यांनी काल ईडी कार्यालयात हजेरी लावली. मात्र, १४ तासांच्या चौकशीनंतर देशमुखांना अटक करण्यात आली. आज त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी देशमुखांना १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीने केली होती. त्यानंतर न्यायालयाने देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी (Anil Deshmukh ED Custody) दिली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या घरावर ईडी, सीबीआय, आयकरविभागाने छापेमारी केली होती. त्यामुळेच देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुखांना ईडीने समन्स बजावले होते. तब्बल पाच समन्स बजावून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली होती. न्यायालयाने ईडीच्या कारवाईपासून कुठलाही दिलासा नाही, असं म्हटल्यानंतर शेवटी अनिल देशमुख सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ''न्यायालयात माझ्या याचिका प्रलंबित होत्या. तसे लेखी उत्तर मी ईडीला दिले होते. मी चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले आहे. आता न्यायलयातील याचिका निकाली निघल्यानंतर मी चौकशीसाठी हजर झालो आहे. मात्र, परमबीरसिंह कुठे आहेत? माझ्यावर आरोप करणारेच फरार आहेत'', असं अनिल देशमुख म्हणाले होते.

सोमवारी त्यांची तब्बल १४ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या नागपुरातील साई शिक्षण संस्थेमध्ये ईडीला काहीतरी पुरावे सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशमुखांनी ईडी कोठडी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT