महाराष्ट्र बातम्या

‘डेल्टा प्लस’मुळे चिंतेत वाढ; जळगाव, रत्नागिरीला इशारा

नामदेव कुंभार

नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोना विषाणूंचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ आढळला असून, राज्यातील जळगाव आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये एकूण २२ पैकी या विषाणूने बाधित झालेले १६ रुग्ण सापडले. त्यामुळे चिंता करण्यासारख्या विषाणूंच्या स्वरूपात कोरोना नियमांचे काटेकोर पालन करीत दोन जिल्ह्यातील परिस्थिती हाताळणीचा सल्ला केंद्र सरकारने या जिल्ह्यांना दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी यासंबंधी माहिती दिली. ते म्हणाले, की इन्साकॉग प्रयोगशाळांच्या संघाने केलेल्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना कोविडचा डेल्टा प्लस या नव्या प्रकाराबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. हा नव्या स्वरूपाचा विषाणू या राज्यांच्या काही जिल्ह्यात आढळला आहे. मंत्रालयाने या तिन्ही राज्यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यात, केरळच्या पलक्कड आणि आणखी एका जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यात हा व्हेरीयंट आढळला आहे.

‘इन्साकॉग’ ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिंतेचा विषय ठरलेल्या या विषाणूंच्या स्वरूपाची वैशिष्ट्ये ही संक्रमण क्षमतेत वाढ, फुप्फुसांच्या पेशींशी संयुग होण्याची अधिक क्षमता, मोनोक्लोनल अँटिबॉडी प्रतिसाद कमी होण्याची शक्यता अशी लक्षणे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांनी या व्हेरीयंटचा सामना करताना सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना आधीप्रमाणेच अमलात आणायच्या असल्या तरीही, त्या अधिक प्रभावीपणे आणि या व्हेरीयंटच्या रुग्णांकडे बारकाईने लक्ष देत अमलात आणल्या जाव्यात, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

विषाणूंच्या या प्रकाराने गंभीर स्वरूप धारण करू नये, त्याचा संसर्ग झपाट्याने वाढू नये यासाठी या जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्राविषयीच्या, तसेच गर्दी टाळणे, कोरोना विषयक नियमांचे कठोर पालन करण्यासाठी उपाययोजना तातडीने अमलात आणल्या जाव्यात, असे निर्देश राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या स्वाबचे नमुने ‘इन्साकॉग’च्या प्रयोगशाळांमध्ये पाठवले जावे. यामुळे त्याचे क्लिनिकल परीक्षण लगेच होऊन, राज्यांना त्याविषयी माहिती दिली जाऊ शकेल, अशी सूचना राज्यांना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

New Rules October 2026: 1 ऑक्टोबरपासून पैशांशी संबंधित 8 मोठे बदल! ATM, FD, EMI, UPI, LPGपासून कारपर्यंत; तुमच्या खिशावर काय परिणाम?

‘ओंकार खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकांच्या आरोपांना ओंकार भोजनेचं उत्तर, अभिनेत्याने सांगितली दुसरी बाजू!

Marathi News Live Updates: जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात तीन तासांपासून रेल्वे थांबली, प्रवाशांचा खोळंबा

IND VS PAK: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकी महामुकाबला कधी, कुठे, किती वाजता? LIVE कुठे पाहायचा?

SCROLL FOR NEXT