बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे महिलेची बदनामी sakal
महाराष्ट्र बातम्या

सायबर पोलिस आरोपींचा घेत आहेत शोध! सोलापूरच्या पोलिस अधीक्षकानंतर सायबर गुन्हेगारांनी आता उपअधीक्षकांचेही उघडले बनावट ‘फेसबुक’, वाचा...

सायबर गुन्हेगारांनी काही दिवसांपूर्वीच पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे बनावट फेसबुक खाते उघडले होते. त्यानंतर बुधवारी (ता. २८) सायबर गुन्हेगारांनी पोलिस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते उघडले होते. त्यामुळे त्यांना व्हॉट्‌सॲप स्टेट्‌स ठेवून संपर्कातील व्यक्तींना त्याबद्दल माहिती द्यावी लागली.

तात्या लांडगे

सोलापूर : सायबर गुन्हेगारांनी काही दिवसांपूर्वीच पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे बनावट फेसबुक खाते उघडले होते. त्यानंतर बुधवारी (ता. २८) सायबर गुन्हेगारांनी पोलिस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते उघडले होते. त्यामुळे त्यांना व्हॉट्‌सॲप स्टेट्‌स ठेवून संपर्कातील व्यक्तींना त्याबद्दल माहिती द्यावी लागली. देवळेकर यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी बनावट खाते बंद केले आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांच्या मूळ फेसबुक खाते इंग्रजी नावाने असून नऊ हजारांवर फॉलोअर्स आहेत. प्रोफाईलवर त्यांचा स्वत:चा फोटो असून तिरंग्याला सलामी देतानाचा दुसरा फोटो आहे. मात्र, सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मूळ फेसबुकवरील एक फोटो घेऊन आणि आई-वडिलांसमवेत असलेला एक फोटो वापरून हिंदीत बनावट फेसबुक अकाउंट उघडले. ज्यावर १०६ फ्रेंड्‌स दिसत होते.

सायबर गुन्हेगाराने त्या बनावट खात्यावरून त्यांच्याच भावाला आणि दुसऱ्या दोघांना काही मोबाईल नंबर मागितले. त्यावेळी याची माहिती श्री. देवळेकर यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने सायबर पोलिसांना सांगून ते बनावट फेसबुक खाते बंद केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सायबर पोलिसांनी पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले होते. त्याआधी तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचेही असेच खाते उघडण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांच्या नावे असाच प्रकार झाला होता.

आता त्या गुन्हेगारांचा शोध सुरू

सातत्याने पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांची बनावट फेसबुक खाती तयार करणाऱ्यांचा शोध सायबर पोलिसांचे पथक घेत आहे. एकच व्यक्ती वेगवेगळ्या सीमकार्डवरून अशी बनावट फेसबुक खाती उघडत आहे की यांची टोळीच सक्रिय आहे, याचा तपास सायबर पोलिस करीत आहेत. बनावट फेसबुक खात्यावरून मोबाईल क्रमांक मागून त्यांच्याकडून पैसे मागितले जातात. पण, कोणी फेसबुकवरून पैसे मागत असल्यास संबंधितांनी पोलिसांशी किंवा त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय थलापती यांच्या मोठ्या घोषणा; 'या' फाईलवर केली पहिली सही

Mumbai: मुंबईत आरबीआय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारणार, २१० झाडांची कत्तल होणार; पर्यावरणप्रेमींची टीका

‘दंड भरावा लागेल’; वाहतूक पोलिसांनी पाकिस्तानच्या क्रिकेटरला रस्त्यातच थांबवलं Video Viral

Latest Marathi News Live Update: विजय थलपतीच्या शपथविधीला राहुल गांधी उपस्थित

Nanded News: मॉन्सूनपूर्व नालेसफाईला प्रारंभ;आयुक्त डॉ. डोईफोडे यांची विविध भागांत पाहणी

SCROLL FOR NEXT