Rain Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात मुसळधार पाऊस, उस्मनाबादमध्ये NDRF पथक दाखल

सकाळ डिजिटल टीम

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने भारताच्या मध्य आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी पहाटे छत्तीसगढपासून ११० किमी अंतरावर आणि आंध्र प्रदेशपासून १४० किमी अंतरावर वादळ होते. पुढच्या १२ तासात वादळ पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता असून त्याची तीव्रता कमी होईल असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रिवादळ रविवारी उशिरा रात्री ओरीसा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर आले. त्याची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली. त्याचा प्रभाव म्हणून राज्यात पुढचे २,३ दिवस मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता. काही ठिकाणी अती वृष्टी शक्यता हवामान विभागाने सोमवारी वर्तवली होती. मराठवाडा विदर्भासह तेलंगनातसुद्धा पुढच्या सहा तासात पावसाचा जोर असणार आहे.

अतिवृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून वाकडी-इस्थळ (ता. कळंब) येथील १७ जण मांजरा नदीच्या पाण्यात अडकले आहेत. अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. उस्मानाबादमध्ये एनडीआरएफची एक टीम पोहोचली असल्याची माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या दोन तीन दिवसात गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय ओडिशा, तेलंगनात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने तेलंगनात फ्लॅश फ्लड रिस्कचा अलर्ट जारी केला आहे. पुढच्या २४ तासात तेलंगनातील काही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणत अनेक जिल्ह्यांमध्ये पूर येऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने सोमवारी वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT