Police
Police 
महाराष्ट्र

‘दक्ष’मधून उमटले पोलिसांचे भावविश्‍व

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ‘दुर्जनांशी कठोर जरी मी; गाभा हळवा असे मनाचा’, असे पोलिसांचे भावविश्‍व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी झालेल्या पहिल्या ‘दक्ष’ पोलिस साहित्य संमेलनात उलगडले. राज्यातील वेगवेगळ्या शहर-गावांतून आलेल्या पोलिसांनी आपल्या भावना कवितांतून व्यक्त केल्या. कर्तव्यकठोर पोलिसांच्या मनाचा कोपरा हळवा असल्याची प्रचिती या साहित्य संमेलनात मिळाली. 

राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘दक्ष’ या पहिल्या पोलिस साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. या वेळी संमेलनाध्यक्ष पोलिस निरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, दहशतवादविरोधी पथकाचे महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आदी उपस्थित होते. या संमेलनात राज्यातील १५०हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. 

राज्य सरकार जिल्हा स्तरावर पोलिसांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. पोलिसांसाठी जिल्हा पातळीवर ग्रंथालये सुरू करण्यात येतील, असे आश्‍वासन गृह राज्यमंत्री केसरकर यांनी दिले. संमेलनाध्यक्ष डॉ. शेखर म्हणाले, की पोलिसांनी निर्माण केलेल्या साहित्याला सत्याचा आधार असतो, त्यांच्या आयुष्यात जे रोज घडते त्याचेच प्रतिबिंब पोलिसांच्या साहित्यात उमटते. हे संमेलन समाज आणि पोलिस यांच्यातील दुवा ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

पोलिसांच्या सेवेत प्रचंड तणाव असतो. पोलिसांचा तणाव कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कविता, लेखन हाच आहे.
- भूषणकुमार उपाध्याय, नागपूरचे पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT