महाराष्ट्र

राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी (अंतर्गत सुरक्षा) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश मंगळवारी (ता. 29) जारी करण्यात आला. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पद मानले जाते. पडसलगीकर यांनी मुंबईचे पोलिस आयुक्तपदही भूषवले होते. 

दत्ता पडसलगीकर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहायक म्हणून काम करतील. देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर राहील. पडसलगीकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांचा उर्दू भाषेचाही चांगला अभ्यास आहे. पडसलगीकर यांनी फ्रान्समधील पॅरिस येथून लोकप्रशासन विषयातील अभ्यासक्रम प्रथम क्रमांकाने पूर्ण केला. या अभ्यासक्रमात 45 देशांतील पोलिस अधिकारी सहभागी झाले होते. 

नागपूर येथे कार्यरत असताना त्यांनी मटका व बेकायदा दारूविक्रीवर कठोर कारवाई केली होती. मुंबईत संघटित टोळ्यांची दहशत असताना अमर नाईक याच्यासारख्या कुख्यात गुंडाला त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कारवाईत टिपण्यात आले होते. गवळी टोळीच्या विरोधातही त्यांनी कठोर कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे विभागाच्या उपायुक्त पदावर काम केले. त्यांनी अमरावती, कराड, नाशिक आदी केंद्रांतही प्रतिनियुक्तीवर काम केले होते. 

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन

उस्मानाबादमध्ये पोलिस अधीक्षक असताना दत्ता पडसलगीकर यांनी निजामाविरोधातील कारवाईत हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या पत्नींची माहिती घेतली. त्यांनी सर्व तपशील गोळा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे 30 वर्षांनंतर हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांना निवृत्तिवेतन सुरू झाले. पोलिस उपायुक्त असताना त्यांनी कामाठीपुरा येथील कुंटणखान्यांतून 450 अल्पवयीन मुलींची सुटका व पुनर्वसन केले होते. 

26/11 च्या तपासात महत्त्वाची कामगिरी

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परदेशातील तपासात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे दहशतवादी व त्यांच्या नियंत्यांचे संभाषण, पुरावे परदेशी यंत्रणांकडून मिळवता आले. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागाबाबत महत्त्वाचे पुरावे भारताच्या हाती लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT