Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

DCM Ajit Pawar : वाद झाले, बंड केलं पण स्थान कायम! अजित पवारांच्या मंत्रालयातील केबिनमध्ये शरद पवारांचा फोटो

दत्ता लवांडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून अजित पवार यांनी फारकत घेऊन सरकारमध्ये सामील झाले असले तरी त्यांच्या मंत्रालयाच्या दालनात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. अजित पवार यांच्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या दालनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो वापरायचा नाही असा आदेश दिला होता. तर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले होते. पक्षाच्या मालकीचा वाद सुरू असून अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आलाय.

मंत्र्यांना झाले खातेवाटप

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्यासोबत ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्या मंत्र्यांना आता खातेवाटप जाहीर झाले असून अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं आलं आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी?

शिवसेनेच्या मंत्र्याकडे असलेले ३ आणि भाजपकडे असलेले ६ खाते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत. तर शिवसेनेचे संजय राठोड, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांचे मंत्रीपद जाणार अशी चर्चा होती. काही खाते काढून घेतल्यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांची नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

SCROLL FOR NEXT