Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र

धार्मिक स्थळे, शाळांबाबत निर्णय सरकारच्या स्तरावर - अजित पवार

सकाळ डिजिटल टीम

पुणे, ता. ८ : राज्यातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर शाळा-महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

देशातील काही इतर राज्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी आहे, त्याठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. तर, काही ठिकाणी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. राज्यात काही पालकांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत सूतोवाच केले आहे. परंतु राज्यात याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

धार्मिक स्थळांचा निर्णय सरकारच्या स्तरावर

धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर घेण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मेट्रो ट्रायलवर भडकण्याची गरज काय?

‘मेट्रोच्या ट्रायल रनचे उद्घाटन कोणाच्याही हस्ते होऊ देत, पुणे मेट्रोचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते होणार,’ असे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात स्पष्ट केले. या संदर्भात पवार म्हणाले, ‘प्रत्येकजण आपापले काम करीत असतो. मेट्रो ट्रायलवर इतके भडकण्याची गरज काय? त्या कार्यक्रमास महापौर आणि भाजपचे इतर पदाधिकारीही हजर होते. कोरोनामुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता तो कार्यक्रम घेण्यात आला.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT