The decision of the alliance is at the local level says Patil
The decision of the alliance is at the local level says Patil 
महाराष्ट्र

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर : पाटील

सकाळवृत्तसेवा

नंदुरबार : लोकसभा, विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व समविचारी पक्षांची आघाडी करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत अशी आघाडी करावी किंवा नाही, हा निर्णय स्थानिक पातळीवरील आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन निर्णय घ्यावयाचा आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगत आघाडीचे सूतोवाच केले. 

पाटील आज जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. त्यांनी आज कार्यकर्ता मेळावा घेतला. या वेळी पाटील म्हणाले, की मराठा व धनगर समाजासह विविध समाजांच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला जात नाही. मात्र, निवडणूक जवळ आली, की सरकार हे निर्णय त्वरित घेऊन फलकबाजी करेल. राज्यात शेतकरी, व्यापारी, नोकरदार, सामान्य जनता या शासनाबाबत समाधानी नाही. प्रत्येक जिल्ह्यात एका महिन्यात बूथ कमिट्या तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT