eknath shinde devendra fadnavis ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Meeting: गेंम चेंजर निर्णय! उद्याच्या कॅबिनेट बैठकीत होणार मोठी घोषणा; नॉन क्रिमिलेयरची मर्यादा...

Non Creamy Layer : नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार असून नॉन क्रिमिलियरची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख करण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार आहे. तसा निर्णय गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

संतोष कानडे

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. कोणत्याही दिवशी आचारसंहितेची घोषणा होऊ शकते. त्यापूर्वी राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी होणारी मंत्रिमंडळाची बैठक गेम चेंजर ठरु शकते, असं बोललं जातंय. त्याचं कारण नॉन क्रिमिलेयरसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार असून नॉन क्रिमिलियरची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख करण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार आहे. तसा निर्णय गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

नॉन क्रिमिलेयरसंदर्भात केंद्र सरकारला राज्य सरकार शिफारस करणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा मोठा निर्णय ठरु शकतो. नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढल्यानंतर ओबीसी, मराठा आणि इतर समाजातील आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे.

विशेष म्हणजे नॉन क्रिमिलियरची मर्यादा पंधरा लाख रुपये केली तर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळ बैठक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

धनु राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): नवसंवत्सरात नवी ऊर्जा, करिअरमध्ये प्रभाव वाढण्याचे संकेत

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT