उजनी धरण Sakal
महाराष्ट्र बातम्या

उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय! पावसाने मारली दडी; आज बोगद्यात, उद्या भीमा नदीत तर परवा कालव्यातून सुटणार पाणी, वाचा...

सिंचनासाठी उजनी धरणातून गुरुवारी (ता. १६) सकाळी सात वाजता भीमा - सीना जोडकालव्यात (बोगदा) २०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (ता. १७) भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सुभिवेंद्र खांडेकर यांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सिंचनासाठी उजनी धरणातून गुरुवारी (ता. १६) सकाळी सात वाजता भीमा - सीना जोडकालव्यात (बोगदा) २०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (ता. १७) भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सुभिवेंद्र खांडेकर यांनी दिली.

उजनी धरणातून भीमा - सीना जोडकालव्यात सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी (ता. १५) जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित शिंदे, आमदार अभिजित पाटील यांनी सिंचनासाठी भीमा - सीना जोडकालव्यात पाणी सोडण्याची मागणी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार जोडकालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे.

तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी भीमा नदीतही पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, भीमा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीकाठावरील ऊसासह अन्य पिके संकटात सापडल्याने सिंचनासाठी नदीत पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती. त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. भीमा नदीच्या जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत हे पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी सांगितले.

कालव्यात कोणीही उतरू नये

उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने कोणीही कालवा - बोगद्यामध्ये उतरू नये. कालवा परिसरात असलेली जनावरे, कृषी अवजारे, विद्युतपंपासह इतर साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच संबंधित विभागांनी व नागरिकांनी आवश्यक दक्षता घेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी.

- एस. यू. डुंबरे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर, ता. माढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

Pune News : कालबाह्य चीज, चढ्या दराने पनीर, शाम्पू विकणे पडले महागात

SCROLL FOR NEXT