महाराष्ट्र

Loksabha 2019 :  आक्षेपार्ह राजकीय जाहिराती हटवा

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - निवडणुकीच्या काळात समाजमाध्यमांवर  (सोशल मीडिया) आक्षेपार्ह राजकीय जाहिराती वेगाने व्हायरल होत असतात. त्यामुळे त्या जाहिराती तातडीने हटवण्याची यंत्रणा तयार करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला. जाहिराती काढून टाकण्यासाठी तीन तास का लागतात, असा प्रश्‍नही खंडपीठाने उपस्थित केला. 

निवडणुकीच्या काळात समाजमाध्यमांवर होणाऱ्या राजकीय जाहिरातींना चाप लावण्याच्या मागणीची जनहित याचिका पुण्यातील सागर सूर्यवंशी यांनी ॲड. अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्यायाधीश न्या. नरेश पाटील आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने २२ पानी निकालपत्र दिले. निवडणुकीच्या आधी ४८ तास समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर अंकुश ठेवण्याबाबत नियमावली तयार करण्याचा आदेशही खंडपीठाने दिला. 

याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या हमीपत्राला उच्च न्यायालयाने मान्यता दिली. राजकीय जाहिरातींना लगाम लावण्याबाबत भारतीय इंटरनेट आणि मोबाईल संघटना आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया यांनी नियमावली तयार केली आहे. न्यायालयाने या बाबींची दखल घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले. आयोगाने प्रमाणित केलेलीच जाहिरात प्रदर्शित करण्यात येईल, अप्रमाणित जाहिराती प्रसिद्ध होणार नाहीत.  एखाद्या पोस्टबाबत आयोगाने हरकत घेतल्यास, ती हटवण्याची कारवाई तातडीने करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. चुकीची पोस्ट हटवण्यासाठी तीन तास लावणे घातक आहे, असे याचिकादारांनी निदर्शनास आणून दिले होते. खंडपीठाने त्याची दखल घेतली. चुकीची पोस्ट हटवण्यासाठी तीन तास घेऊ नयेत; कारण इंटरनेटवरील पोस्ट वेगाने व्हायरल होत असतात. त्यामुळे दिशाभूल टाळण्यासाठी संबंधित पोस्ट लवकर हटवण्याची यंत्रणा कार्यान्वित करायला हवी, असे खंडपीठाने सांगितले.

समाजमाध्यमांची तयारी
फेसबुक, ट्‌विटर, गुगल आणि यू-ट्युबवर निवडणुकीच्या आधी प्रसारित केल्या जाणाऱ्या राजकीय जाहिराती आणि मजकुरावर निर्बंध आणण्याची तयारी त्यांनी स्वतःहून केली आहे. मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीच्या प्रमाणपत्राशिवाय राजकीय जाहिरात प्रसिद्ध होणार नाही. निवडणूक आयोगाने निर्देश दिल्यानंतर तातडीने कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फेसबुक आणि गुगल यांनी स्वतंत्र नियमावली तयार केली असून, अंमलबजावणीही सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT