Electricity
Electricity 
महाराष्ट्र

राज्यात विजेची विक्रमी मागणी

सकाळवृत्तसेवा

२०,६३० मेगावॉटचा पुरवठा; ९५० मेगावॉटचे भारनियमन
नागपूर - ऑक्‍टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोमवारी २४ हजार ९६२ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली. आजवर एकाच निवशी नोंदविलेली ही सर्वाधिक मागणी ठरली आहे. महावितरणने २० हजार ६३० मेगावॉटचा पुरवठा केला. मात्र, पुरेशी वीज उलब्ध नसल्याने ९५० मेगावॉट विजेचे भारनियमन करावे लागले.

ऑक्‍टोबर हिट त्यात शेतीला पाणी देण्यासाठी विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी उन्हाळ्यातील मागणीपेक्षाही ऑक्‍टोबर महिन्यात विजेची अधिक मागणी नोंदविण्यात येत आहे. राज्यात १६ ऑक्‍टोबरला २४ हजार ९२२ मेगावॉटची मागणी नोंदविली गेली. यात महावितरणच्या भागात २१ हजार ५४२ मेगावॉट, १७ ऑक्‍टोबरला २४ हजार ६८७ मेगावॉट, त्यातील महावितरणच्या भागात २१,२२३ मेगावॉट विजेची मागणी होती. सोमवारी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात २१,५८० मेगावॉट विजेची मागणी होती.

विजेची मागणी एकदम वाढल्यामुळे महावितरणने नियोजन करीत २० हजार ६३० मेगावॅट विजेचा पुरवठा करीत ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. उपलब्ध विजेपेक्षा मागणी अधिक असल्याने जी-१ ते जी-३ गटातील वाहिन्यांवर ९५० मेगावॉट विजेचे भारनियमन करण्यात आले. महापारेषणने सोमवारी राज्यात एकूण २४ हजार १२ मेगावॉटवीज पारेषित केल्याची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT