Ajit Pawar and Ram Shinde 
महाराष्ट्र बातम्या

भाजपचे राम शिंदे पवारांच्या दारात; चर्चेला उधाण

दत्ता उकिरडे

राशीन (अहमदनगर) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आणि भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आणि माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांचे विश्वासू सहकारी प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात शनिवारी (ता.१२) कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अर्धा तास गुप्त बैठक झाल्याची चर्चा आज कर्जत तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली.

मात्र ही बैठक कोणत्या विषयावर होती हे समजू शकले नाही. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. ही बैठक राज्याच्या राजकारणाशी निगडीत होती कि कर्जत-जामखेड मतदारसंघाशी, अथवा आगामी लक्षवेधी राजकीय घडामोडीबाबत या बैठकीत नेमकी कोणती डाळ शिजली याचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिले.(deputy-c-m-ajit-pawar-and-former-minister-ram-shinde-meeting-administrative-building-of-ambalika- sugar-factory-ahmednagar-political-news)

शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री पवार व माजी मंत्री प्रा.शिंदे या दोघांमध्ये अंबालिका साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत ही बैठक झाली. विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून प्रा.शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. आमदार रोहित पवार व प्रा.शिंदे यांच्या समर्थकांकडून कर्जत-जामखेड मतदार संघातील विविध प्रश्नावर एकमेकांना लक्ष्य केले जात आहे. असे असताना हि बैठक कोणती खिचडी शिजवण्यासाठी झाली असेल याची उत्सुकता पवार व शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना लागली आहे. राम शिंदे हे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जात असल्याने त्यांचा काही निरोप घेऊन अजित पवारांना भेटले असतील काय, ही भेट राज्यातील घडामोडीची नांदी तर नसेल अशा चर्चांना उधाण आले होते.

प्रा.राम शिंदे : या भेटीबाबत प्रा.शिंदे यांना विचारले असता त्यांनी अशी बैठकच झाली नसल्याचे सांगत पवार -शिंदे भेटीच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT