Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: आठवड्याभरात साडेअठरा हजार पदांसाठी पोलिस भरतीची जाहिरात निघणार; उपमुख्यमंत्री म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः येत्या आठवड्याभरात साडेअठरा हजार जागांसाठी पोलिस भरतीची जाहिरात निघणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शासकीय नोकरी मिळालेल्या तरुणांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते.

केंद्राच्या वतीने देशभरात ७५ हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून दोन हजार जणांना आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या तरुणांना शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येत्या आठवड्याभरामध्ये साडेअठरा हजार जागांसाठी पोलिस भरतीची जाहिरात निघणार आहे. महिन्याभरात साडेदहा हजार पदं ग्रामविकास विभागामार्फत भरली जाणार आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सर्व विभागांमध्ये भरती प्रक्रियेचं कामकाज सुरु झालेलं आहे. मात्र ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य सरकार विशेष काळजी घेणार आहे. चांगल्या एजन्सीज् शोधून त्यांना काम दिलं जाईल. परीक्षा फी थोडीबहूत जास्त असेल पण भरती पारदर्शक होईल. टीसीएससारख्या कंपन्यांना भरतीचं काम देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितंल. वर्षभरामध्ये प्रस्तावित जागा भरल्या जातील, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सुर्यवंशीचा जबरदस्त विक्रम अन् टोलेजंग फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय..

Latest Marathi News Live Update : गडचिरोली पोटनिवडणुकीत भाजपचे अंकुश नैताम विजयी; काँग्रेसला धक्का

SCROLL FOR NEXT