Eknath Shinde  sakal
महाराष्ट्र बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..! सत्ता मिळवण्याचा आमचा अजेंडा नाही, भाजप-शिवसेनेत मतभेद नाहीत, मित्रपक्ष म्हणून आमचे हातात हात

केवळ सत्ता मिळवणे हा आमचा अजेंडा नाही. ज्यांनी आम्हाला खुर्चीवर बसवले, त्याचे प्रश्न सोडवण्याचा आमचा अजेंडा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भाजप- शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही मित्रपक्ष म्हणून हातात हात घालून काम करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ डिजिटल टीम

पंढरपूर : केवळ सत्ता मिळवणे हा आमचा अजेंडा नाही. तर ज्यांनी आम्हाला खुर्चीवर बसवले, त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा आमचा अजेंडा आहे. लोकांची कामे करणे हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही मित्रपक्ष म्हणून हातात हात घालून काम करत आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संत नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज ते पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना लोकांच्या हिताची कामे करण्याची जी साधूसंतांनी शिकवण दिली आहे. त्याचे अनुकरण आम्ही करतो, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, खुर्ची मिळावी म्हणून आम्ही राजकारण आणि समाजकारण करत नाही. त्यासाठी आम्ही कधीच तो अजेंडा ठेवला नाही.

साधूसंतांनी जी सेवाभावी वृत्तीने काम करण्याची शिकवण दिली आहे. त्यानुसार राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत आलोय आहे. लोकांची समस्या, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम आम्ही करतो. लोकांची कामे करणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. काही मंत्र्यांना वगळण्याची चर्चा सुरू आहे, यावर बोलताना पदे वर खाली होत असतात. मात्र आम्ही टीम म्हणून काम करत आहे, असे शिंदे यांनी सांगितले. कोणत्या मंत्र्यांना वगळले जाणार आहे, असे पुन्हा विचारले असता त्यांनी हात जोडून बोलण्यास नकार दिला.

'एसटी'ची सामूहिक बुकिंगवरील भाडेवाढ रद्द

दोन दिवसापूर्वी एसटी महामंडळाने ग्रुप बस बुकिंगवर ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भाडेवाढ रद्द करावी, अशी सूचना परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना दिल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक भाविक सामूहिकपणे एसटीने प्रवास करतात. दोन दिवसापूर्वी सामूहिक प्रवासाच्या तिकिटामध्ये महामंडळाने ३० टक्के भाडेवाढ केली होती.

‘महाराष्ट्राचा विकास होऊ दे’

राज्यातील बळिराजा, अन्नदाता सुखी होऊ दे. त्याच्या शेतात चांगले पिके येऊ दे. बळीराजाच्या आयुष्यात सुखाचे व समृद्धीचे दिवस येऊ दे. पांडुरंगाचा वारकरी सुखी होऊ दे, त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येऊ दे आणि महाराष्ट्राचा विकास होऊ दे, असे साकडे विठुरायाच्या चरणी आपण घातल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. श्री. शिंदे यांनी आज गर्दी कमी असल्याने देवाचे पदस्पर्श दर्शन घेतले. आज देवाचा पोशाख सुरू असल्याने श्री. शिंदे यांना बराच वेळ चौखांबीत बसून देवाचे सावळे रूप डोळ्यात साठवून ठेवण्याचा योग आला. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, तहसीलदार सचिन लंगोटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, त्याची चुकीची प्रतिमा तयार केली; ममता कुलकर्णींच्या वादग्रस्त विधानाने खळबळ

Woman Doctor Case: आम्हाला गोवण्याचे विरोधकांचे षडयंत्र: दिलीपसिंह भोसले; सुषमा अंधारे, आगवणेंच्या मागे कोणीतरी मास्टरमाइंड

Yashani Nagarajan: माध्यमिक शिक्षण विभागाच्या सखोल चौकशीसाठी समिती: कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन; चुकीचे काम करणाऱ्यांची गय नाही

Woman Doctor Case: 'गोपाल बदनेचा मोबाईल पोलिसांकडे'; फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी संशयितांना आज न्यायालयात हजर करणार

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आचारसंहितेपूर्वी दोन हप्ते? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची १५ नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT