devendra fadanvis devendra fadanvis
महाराष्ट्र बातम्या

'अजित पवार सपोर्ट करत नाही, पण बडे साहब...' फडणवीसांचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

फडणवीसांनी पुण्यात गिरीश महाजनांवर खोट्या केसेस दाखल करण्यासाठी कसं कारस्थान रचण्यात आलं याचा पाढा वाचला आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आज सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात षडयंत्र रचले जात असल्याचा धक्कादायक असे आरोप केले. याबाबत त्यांनी पुरावा म्हणून विशेष सरकारी वकिल प्रविण चव्हाण यांचे काही व्हिडिओ पेन ड्राइव्हमधून अध्यक्षांकडे दिले आहेत. यात फडणवीसांनी पुण्यात गिरीश महाजनांवर खोट्या केसेस दाखल करण्यासाठी कसं कारस्थान रचण्यात आलं याचा पाढा वाचला आहे. यात त्यांनी महाविकास आघाडीत मंत्र्यांचीसुद्धा नावे घेतली आहे.

प्रवीण चव्हाण यांचा व्हिडिओ याबाबत पेन ड्राइव्हमध्ये दिला असून त्यात असलेल्या व्हिडिओत धक्कादायक अशी माहिती असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच एका व्हिडिओमध्ये या सगळ्याला अजित पवार सपोर्ट करत नसल्याचा उल्लेख असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणातात की व्हिडिओत ते असं बोलताना दिसतं की, अजित पवार सपोर्ट करत नाही, पण बडे साहब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का. चांगल्या अधिकाऱ्यांची नावे द्या असं त्यांनी सांगितलंय. त्यांची नावे द्या आणि त्यानंतर आपण कारवाई करू असं मला सांगतिलं आहे.

सरकारी वकील रेड करणाऱ्यांना सांगतात की रोख पैसे द्या. यासाठी मदत लागली तर खडसेंची मदत घ्या असे निर्देश प्रवीण चव्हाण यांनी दिले आहेत. ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता, एक चाकू विकत घ्यायचा आणि जोपर्यंत चर्चा सुरु आहे तोवर फेकायचा आणि जप्त करायचा असा प्लॅन व्हिडिओत सांगण्यात येत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फडणवीस यांनी म्हटलं की, व्हिडिओत असंही ऐकू येतं की, अनेकांनी माझ्या नावाची शिफारस केली आहे.दिलीप बोरले, वळसे-पाटील , आव्हाड, मुश्रीफ, गुलाबराव आणि गुलाबराव युट्यूब, श्रीनिवास पाटील यांची नावे घेत पत्रे पाठवली. या सर्वांनी साहेबांना पत्र दिली. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डिजींना भेटून सीपींना काढणार असंही सांगण्यात येतंय. साहेबांना फोन करून मिटिंग लावली, एक दिवसात एफआयआर ड्राफ्ट केला. मी कलमे लावली पण त्यांनी काही पॅरा गहाळ केले असं प्रवीण चव्हाण बोलल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

SC-ST-OBC आरक्षणात नवा उप-कोटा? सर्वोच्च न्यायालयात केंद्राने मांडली भूमिका, आय आधारित उप-कोट्याला विरोध

School Stabbing Incident: देवगाव रंगारीत शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने हल्ला; चौघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Nashik Village Water Crisis: खाजगी जमिनीच्या वादामुळे दसाने गावाचा पाणीपुरवठा ठप्प; संतप्त महिलांचा हंडा मोर्चा, ग्रामपंचायतीला कुलूप

राज्यात ३०,२०९ शिक्षकांची भरती! जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १३,३५१, तर खासगी शाळांमधील १२,१४८ पदे; १९ हजार ८८१ शिक्षकांना मिळणार थेट नियुक्ती

SCROLL FOR NEXT